भारतीय सैनिकांनी गोळीबार केला नाही, चीनच्या दाव्याचं खंडन

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 08, 2020 | 12:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताने नुकताच पँगाँग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रदेशाचा ताबा घेऊन चीनला धक्का दिला. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि लष्करी वाटाघाटी सुरू आहेत, पण काही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

Pangong Tso faceoff
गोळीबार झालाच नाही: भारताने पँगाँग त्सोच्या दक्षिणेला भारतीय सेनेने गोळीबार केल्याचा चीनचा दावा नाकारला  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • मेच्या पहिल्या आठवड्यापासून दोन्ही देशांमध्ये चालू आहे तणाव
  • चीनच्या पीएलए सेनेने भारताच्या गस्तपथकाला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा भारताचा दावा
  • जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंना झाले होते मोठे नुकसान

लडाख: चीनने (China) सोमवारी भारतीय सेनेने (Indian troops) पँगाँग त्सोच्या दक्षिण किनाऱ्यावरील (South banks of Pangong Tso) प्रदेशात बेकायदेशीररित्या वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडल्याचा आरोप (alleged illegal transgression across LAC) केला. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ गोळीबार झाल्याच्याही काही बातम्या समोर (reports of firing near LAC) आल्या. भारताने मात्र अशा बातम्या फेटाळून लावल्या आहेत (India denied such reports) आणि अधिकृत स्रोतांनी टाइम्स नाऊला दिलेल्या माहितीनुसार (information given to Times Now by official sources) पँगाँग त्सोच्या दक्षिण किनाऱ्यावरील विवादित सीमेवर कुठलाही गोळीबार झालेला (no firing near disputed border in the South of Pangong Tso) नाही.

मेच्या पहिल्या आठवड्यापासून दोन्ही देशांमध्ये चालू आहे तणाव

चीनी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार याआधी पीपल्स लिबरेशन आर्मीचे दक्षिण कमांडर कर्नल झांग शुईली यांनी भारत प्रादेशिक तणाव वाढवत असल्याचा आरोप करून अशा हालचाली गंभीर लष्करी चिथावणी असल्याचेही म्हटले होते.

कर्नल शुईली यांनी आपल्या अधिकृत विधानात म्हटले होते, “आम्ही भारताला विनंती करतो की त्यांनी अशा धोकादायक हालचाली ताबडतोब थांबवाव्यात, सीमारेषेच्या आमच्या बाजूकडील जवानांना मागे हटण्यास सांगावे, सीमारेषेवरील जवानांना ताबा ठेवण्यास सांगावे आणि ज्यांनी गोळीबार केल्या त्या जवानांची कठोर चौकशी करावी जेणेकरून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत.”

“भारताच्या कृत्यांनी संबंधित करार आणि भारत-चीनदरम्यानच्या करारांचे घोर उल्लंघन केले आहे. यामुळे प्रादेशिक तणाव वाढले आहेत आणि गैरसमज होत आहेत.”

भारतीय गस्त पथकांना घाबरवण्यासाठी पीएलए सैन्याचा हवाई गोळीबार: सूत्र

भारतीय सैन्याने अधिकृतरित्या काही माहिती दिलेली नसली तरी संस्थांच्या बातम्यांनुसार चीनी सैन्याने भारतीय गस्तपथकांना घाबरवण्यासाठी हवाई गोळीबार केला.

जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंना झाले होते मोठे नुकसान

भारताने नुकताच लडाखमधील चुशुल येथे भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचा पीएलएचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये एप्रिल-मेपासूनच पीएलएने फिंगर एरिया, गलवान खोरे, हॉट स्प्रिंग्स आणि कॉनग्रुंग नाला इत्यादी भारताच्या प्रदेशात घुसखोरी केल्यानंतर प्रचंड तणाव आहे.

यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते तर चीनलाही मोठा धक्का बसला होता. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि लष्करी वाटाघाटी सुरू आहेत, पण काही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी