SC on Param Bir Singh's plea परमबीर आपण आहात कुठे, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

'No hearing until we know where you are': SC on Param Bir Singh's plea परमबीर यांनी स्वतःच्या ठावठिकाण्याची माहिती जाहीर न करता सर्वोच्च न्यायालयात याचिका करुन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी करू, पण परमबीर आपण आहात कुठे; असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

'No hearing until we know where you are': SC on Param Bir Singh's plea
परमबीर आपण आहात कुठे, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल 
थोडं पण कामाचं
  • परमबीर आपण आहात कुठे, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
  • याचिका करणारी व्यक्ती कुठे आहे हे त्याच्या वकिलाला माहिती नाही. पोलीस याचिका करणाऱ्याला शोधत आहेत
  • या परिस्थितीत सुनावणी कशी करायची - सर्वोच्च न्यायालय

'No hearing until we know where you are': SC on Param Bir Singh's plea नवी दिल्ली: खंडणी वसुली प्रकरणातील आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबईतील एका कोर्टाने फरार जाहीर केले आहे. परमबीर यांनी स्वतःच्या ठावठिकाण्याची माहिती जाहीर न करता सर्वोच्च न्यायालयात याचिका करुन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी करू, पण परमबीर आपण आहात कुठे; असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

याचिका करणारी व्यक्ती कुठे आहे हे त्याच्या वकिलाला माहिती नाही. पोलीस याचिका करणाऱ्याला खंडणी प्रकरणात शोधत आहेत. अशा परिस्थितीत सुनावणी कशी करायची, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. आता पुढील सुनावणी पर्यंत परमबीर सिंह जगासमोर येतील आणि नंतर अटकेपासून दिलासा मिळवण्यासाठी कोर्टात दाद मागतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) दाखल केला होता. या अर्जावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने निर्णय दिला. परमबीर सिंह यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या आरोपींनाही फरार घोषित केले आहे.

फरार घोषित झाल्यामुळे परमबीर सिंह यांना ३० दिवसांची मुदत मिळणार आहे. या मुदतीत न्यायालयासमोर हजर झाले नाही तर परमबीर सिंह यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी