e-visa भारताने चीन, हाँगकाँग, मकाऊला ई-व्हिसा नाकारला

No Indian e-visa for mainland Chinese or those from Hong Kong, Macau सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ पासून जगातील १५२ देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. या देशांमधून चीन, हाँगकाँग, मकाऊ यांना वगळण्यात आले आहे.

No Indian e-visa for mainland Chinese or those from Hong Kong, Macau
e-visa भारताने चीन, हाँगकाँग, मकाऊला ई-व्हिसा नाकारला 
थोडं पण कामाचं
  • e-visa भारताने चीन, हाँगकाँग, मकाऊला ई-व्हिसा नाकारला
  • सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ पासून जगातील १५२ देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल
  • आधी चीनसह १७१ देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येत होता

No Indian e-visa for mainland Chinese or those from Hong Kong, Macau । नवी दिल्ली: वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या चीनला वठणीवर आणण्यासाठी भारताने आणखी एक कठोर पाऊल उचलले. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सोमवार १५ नोव्हेंबर २०२१ पासून जगातील १५२ देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. या देशांमधून चीन, हाँगकाँग, मकाऊ यांना वगळण्यात आले आहे.

आधी चीनसह १७१ देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येत होता. आता १५२ देशांतील नागरिकांनाच भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. चीन, हाँगकाँग, मकाऊ, कॅनडा, युनायटेड किंगडम, इराण, मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया तसेच अन्य निवडक देशांतील नागरिकांना भारताचा ई-व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. 

ज्या देशांनी भारताच्या सुरक्षेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला अथवा महत्त्वाच्या मुद्यांवर भारतासोबत असहकार केला त्या देशांतील नागरिकांना ई-व्हिसा सुविधा दिली जाणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी