Prashant Kishor : उत्तर प्रदेश निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडणार नाही, रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा अंदाज

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणूकीची सेमी फायनल समजली जाते. परंतु या निवडणुकीचा लोकसभा निवडणूकीवर फार प्रभाव पडणार नाही असा अंदाज रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.no relevance between up election 2022 and general election 2024 prashant kishor

prashant kishor
प्रशांत किशोर 
थोडं पण कामाचं
  • २०२२ ची उत्तर प्रदेश निवडणूक आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक यांचा फार संबंध नाही.
  • २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणूकीचा प्रभाव लोकसभा निवडणूकीवर पडणार नाही
  • विरोधी पक्षाला सल्ला

Prashant Kishor: नवी दिल्ली : पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक (UP Election) होऊ घातली आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणूकीची (Loksabha Election) सेमी फायनल समजली जाते. परंतु या निवडणुकीचा लोकसभा निवडणूकीवर फार प्रभाव पडणार नाही असा अंदाज रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी व्यक्त केला आहे. तसेच २०२४ पूर्वी अनेक राज्यात निवडणूका आहेत असेही किशोर म्हणाले. (no relevance between up election 2022 and general election 2024 prashant kishor)


टाईम्स नाऊ नवभारतला दिलेल्या मुलखातीत प्रशांत किशोर म्हणाले की २०२२ ची उत्तर प्रदेश निवडणूक आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक यांचा फार संबंध नाही. २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणूकीचा प्रभाव लोकसभा निवडणूकीवर पडणार नाही. २०१२ साली उत्तर प्रदेश निवडणूकीत भाजपला यश मिळाले नव्हते. तरी २०१४ साली भाजपला केंद्रात बहुमत मिळाले होते. आजही जर २०२२च्या उत्तर प्रदेश निवडणूकीत भाजपला यश मिळेल किंवा अपयश त्यामुळे २०२४ च्या निवडणुकांमध्ये फार फरक पडणार नाही असा अंदाज किशोर यांनी व्यक्त केला आहे. 


विरोधी पक्षाला सल्ला 

सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरी याचा अर्थ असा होत नाही की एक सक्षम विरोधी पक्ष तयार होईल असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षाला प्रशांत किशोर यांनी 4M चे सुत्र दिले आहे. मेसेंजर, मेसेज, मिशनरी आणि मेकॅनिक्स, मेसेंजर म्हणजे विरोधी पक्षाला एक चांगला चेहरा हवा जो जनतेशी नातं जोडेल. मेसेज म्हणजे जनतेला सांगायला एक संदेश हवा जो या नेत्याने सांगणे गरजेचे आहे. सर्व विरोधी पक्ष एक मिशनरी आणि म्हणजेच त्यांच्याकडे एक समान उद्दिष्ट हवे तसेच सत्ताधारी पक्षाल हरवण्यासाठी मेकॅनिक्स म्हणजे उत्तम प्रचारतंत्र असले पाहिजे. विरोधी पक्षाकडे हे ४ एम असेल तर ते सत्ताधारी पक्षाविरोधात लढाई लढू शकतात असे मत किशोर यांनी व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी