SSC and HSC Exam । लस नाही तर बोर्डाची परीक्षा नाही, विद्यार्थ्यांसाठी आदेश

No vaccine, no board exam : लस नाही तर बोर्डाची परीक्षा देता येणार नाही असे परिपत्रक एका बोर्डाने भारतात काढले आहे.

No vaccine, no board exam
लस नाही तर बोर्डाची परीक्षा नाही, विद्यार्थ्यांसाठी आदेश 
थोडं पण कामाचं
  • लस नाही तर बोर्डाची परीक्षा नाही, विद्यार्थ्यांसाठी आदेश
  • देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार ३ जानेवारी २०२२ पासून सुरू
  • लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी बोर्डाने परिपत्रक काढले

No vaccine, no board exam : नवी दिल्ली : लस नाही तर बोर्डाची परीक्षा देता येणार नाही असे परिपत्रक एका बोर्डाने भारतात काढले आहे. देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार ३ जानेवारी २०२२ पासून सुरू आहे. या लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी बोर्डाने परिपत्रक काढले आहे. आयसीएसई बोर्डाच्या या परिपत्रकात सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना लस अनिवार्य करण्यात आली आहे. लस घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहीत करा, असा सल्ला आयसीएसई बोर्डाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.

वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संकटात 'या' नियमांनुसार व्हावे लागेल होम क्वारंटाइन!

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौरांचे महत्त्वाचे वक्तव्य

इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाने त्यांच्या cisce.org या वेबसाइटवर एक परिपत्रक काढले आहे. यात 'दहावीच्या अर्थात आयसीएसई परीक्षा २०२२ (ICSE Board Exam 2022) आणि बारावीच्या अर्थात आयएससी परीक्षा २०२२ (ISC Board Exam 2022) च्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थी घरून शाळेत जाणे, वर्गांमध्ये उपस्थित राहणे, दैनंदिन काम पूर्ण करण्यासोबतच सेमिस्टर २ बोर्ड परीक्षा देखील देऊ शकतात' असे नमूद आहे. आयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गॅरी अराथून यांची परिपत्रकाखाली सही आहे.

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डसह भारतातील सर्व राज्यांच्या बोर्डच्या शाळांमधून मुलांच्या लसीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. खासगी शाळांतूनही लसीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी