Malala Yousafzai Marriage : साथीदारासाठी कागदपत्रांवर सह्या का करता म्हणणारी मलाला सही करून अडकली विवाहबंधनात

Malala Yousafzai Marriage :नोबेल पुरस्कार (Nobel peace prize) विजेती (winner) मलाला युसूफझाई (Malala Yousafzai)चा विवाह (Marriage ) सोहळा नुकताच पार पडला आहे.

Nobel peace prize winner malala yousafzai married
नोबेल पुरस्कार विजेती मलालाने बर्मिंघममध्ये बांधली लग्नगाठ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मलाला युसुफजई विवाहबंधनात
  • ब्रिटनमध्ये पार पडला समारंभ
  • आपल्या घरीच छोटेखानी सोहळ्यात विवाह समारंभ पार पडल्याचं मलालाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Malala Yousafzai Marriage : लंडन : नोबेल पुरस्कार (Nobel peace prize) विजेती (winner) मलाला युसूफझाई (Malala Yousafzai)चा विवाह (Marriage ) सोहळा नुकताच पार पडला आहे. मलालाने असर मलिक (Asser Malik) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावरून मलाला हिनेच आपल्या विवाहाची माहिती दिली आहे. मलालाच्या ब्रिटन (Britain) मधल्या घरीच हा समारंभ पार पडला.आपल्या घरीच छोटेखानी सोहळ्यात विवाह समारंभ पार पडल्याचं मलालाने म्हटले आहे.

मलालाची खास पोस्ट

मलालाने लग्न सोहळ्यातील फोटो ट्वीटरवर शेअर करून लिहीले, 'आज माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. असर आणि मी विवाहबंधनात अडकलो आहोत. आम्ही आमच्या कुटुंबासोबत बर्मिंघममध्येच आपल्या घरी निकाह समारंभ साजरा केला. तुमच्या शुभेच्छा असू द्या. पुढच्या प्रवासात सोबत चालण्यासाठी आम्ही उत्साही आहोत', असं मलालानं सोशल मीडियावर म्हटलंय. सोबतच, पती असरसोबतचे काही फोटोही मलालानं शेअर केले आहेत.
मलाला युसुफजई ही सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणारी सामाजिक कार्यकर्ता ठरली होती.  

मलाला युसुफजई हिचा जन्म पाकिस्तानात झाला होता. आपल्या वडिलांसोबत पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या मलालावर तालिबानी दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये समोरून गोळीबार केला होता. त्यावेळी मलाला केवळ ११ वर्षांची होती. शाळेतून घरी परतणाऱ्या मलालाची शाळेची बस अडवून हा हल्ला करण्यात आला होता. ब्रिटनमध्ये दीर्घकाळ उपचारानंतर मलालाच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यानंतर येथूनच मलालाने आपले कार्य सुरू ठेवले. तिच्या वडिलांनाही ब्रिटनमधील पाकिस्तानी दूतावासात नोकरी देण्यात आली होती.

दरम्यान, व्होग या प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलालाने लग्नाला अनावश्यक म्हटले होते. ती म्हणाली होती की लोक लग्न का करतात हे मला समजत नाही. जर तुम्हाला जीवनसाथी हवा असेल तर तुम्ही लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या का करता, फक्त भागीदारी का होऊ शकत नाही? मलालाच्या या विधानावर इतका वाद झाला की तिचे वडील झियाउद्दीन युसुफझाई यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी