Weather Update News : सध्या उत्तर भारत (North India) चांगलाच गारठला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. वातावरणात (Climate)सातत्यानं बदल होत असून कुठे थंडीने हुडहुड भरवली आहे तर कुठे ढगाळ वातावरण दिसत आहे. सध्या उत्तर भारत (North India) चांगलाच गारठला आहे. तर महाराष्ट्रातही (Maharashtra)तापमानाचा(Temperature) पारा घसरला आहे. त्यामुळं थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत.( North India became cold, mercury also fell in Maharashtra)
अधिक वाचा : Death While Making Reels : रील्स बनवताना रेल्वेची धडक, 2 ठार
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 8 ते 11 जानेवारी या कालावधीत विदर्भातील काही भागासह राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : BJP MLA Laxman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 9 अंशावर गेल्यानं हुडहुडी वाढली आहे. तर औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. दोन्ही ठिकाणी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यातही पारा घरसला असून तेथे 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह कोकणात देखील थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे.
देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. डोंगर रांगांपासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. वायव्य भारत आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 6 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तसेच पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने रागात राक्षसी कृत्य
पुढच्या दोन दिवसात वायव्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे.