उत्तर कोरियात कोरोनाचे थैमान, आढळले लाखो रुग्ण

North Korea Daily Suspected Covid Cases Drop Below 200000 Shows Positive Trend : उत्तर कोरियात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत देशात १ लाख ८६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती उत्तर कोरियाने दिली आहे.

North Korea Daily Suspected Covid Cases Drop Below 200000 Shows Positive Trend
उत्तर कोरियात कोरोनाचे थैमान, आढळले लाखो रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उत्तर कोरियात कोरोनाचे थैमान, आढळले लाखो रुग्ण
  • उत्तर कोरियात अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झालेले नाही
  • कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची माहिती दिल्यानंतर दहा दिवसांतच उत्तर कोरियात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली

North Korea Daily Suspected Covid Cases Drop Below 200000 Shows Positive Trend : उत्तर कोरियात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत देशात १ लाख ८६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती उत्तर कोरियाने दिली आहे. चिंतेची बाब म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना उत्तर कोरियाने देशात कोरोना प्रतिबंधक अशा कोणत्याही लसला मान्यता दिली नाही आणि लसीकरण पण केलेले नाही. यामुळे उत्तर कोरियाला कोरोनाचा मोठा धोका आहे. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

Monkeypox Virus: 12 देशात मंकीपॉक्सचे रुग्ण; ट्रॅव्हल लिंकशिवाय मंकीपॉक्स आफ्रिकेबाहेर कसा पसरतो? WHO ने उत्तर दिले

कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या ओमिक्रॉनने बाधीत रुग्ण आढळल्याचे उत्तर कोरियाने १२ मे २०२२ रोजी जाहीर केले. तोपर्यंत उत्तर कोरिया सरकार देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही असेच सांगत होते. कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची माहिती दिल्यानंतर दहा दिवसांतच उत्तर कोरियात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ६७ जणांचा मृत्यू झाल्याचे उत्तर कोरिया सरकारने सांगितले. 

कोरोनाला आळा घालण्यासाठी उत्तर कोरियाने देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी देशात महामारी आणीबाणी लागू करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निर्बंधांमुळे आर्थिक आव्हाने, कमकुवत वैद्यकीय सेवा आणि अन्नटंचाई या तीन समस्यांना सामोऱ्या जात असलेल्या उत्तर कोरियात कोरोनाच्या रुपाने नव्या संकटाचे आगमन झाले आहे.

ज्यांना कोरोना झाला आहे आणि अद्याप बरे झालेले नाहीत अशांना कोरोना अॅक्टिव्ह म्हणतात. जगात सध्या २ कोटी ३७ लाख ४९ हजार ७४२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेत २३ लाख ६९ हजार ३०८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जर्मनीत १३ लाख ४१ हजार १०८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. व्हिएतनाममध्ये १२ लाख ७१ हजार ३९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तैवानमध्ये ११ लाख ६९ हजार ५१५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. इटलीमध्ये ८ लाख ५६ हजार ८६९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ज्या देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले त्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला भारत कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ५८व्या स्थानावर आहे. भारतात १४ हजार ९५५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी