'झिरो कोविड केस'चा दावा करणाऱ्या देशात कोरोना

North Korea registers first-ever Covid case, Kim Jong orders nationwide lockdown : झिरो कोविड केस अर्थात शून्य कोरोना रुग्ण स्थितीचा दावा करणाऱ्या उत्तर कोरिया या देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

North Korea registers first-ever Covid case, Kim Jong orders nationwide lockdown
'झिरो कोविड केस'चा दावा करणाऱ्या देशात कोरोना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'झिरो कोविड केस'चा दावा करणाऱ्या देशात कोरोना
  • उत्तर कोरियात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद
  • उत्तर कोरियात अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला किम जोंग उन यांनी परवानगी दिलेली नाही

North Korea registers first-ever Covid case, Kim Jong orders nationwide lockdown : प्योंगयांग (Pyongyang) : झिरो कोविड केस अर्थात शून्य कोरोना रुग्ण स्थितीचा दावा करणाऱ्या उत्तर कोरिया या देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या प्रशासनाने देशात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाल्याचे जाहीर केले आहे.

Monkeypox : कोरोना नाही आता मंकीपॉक्सचा धोका, उपचार उपलब्ध नाही

उत्तर कोरियात अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला किम जोंग उन यांनी परवानगी दिलेली नाही. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निर्बंधांमुळे आर्थिक आव्हाने, कमकुवत वैद्यकीय सेवा आणि अन्नटंचाई या तीन समस्यांना सामोऱ्या जात असलेल्या उत्तर कोरियात कोरोनाच्या रुपाने नव्या संकटाचे आगमन झाले आहे.

उत्तर कोरियातील पहिल्या कोरोना रुग्णाच्या शरीरात ओमिक्रॉन बीए पॉइंट टू (Omicron BA.2 variant) हा कोरोना विषाणूचा अवतार आढळला आहे. देशात कोरोना संसर्ग किती पसरला आहे हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. लसीकरण झालेले नाही आणि मास्कचे बंधन पण नाही यामुळे उत्तर कोरियाला कोरोनाचा मोठा धोका आहे.

कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद होताच उत्तर कोरियात लॉकडाऊन लागू केल्याचे किम जोंग उन यांनी जाहीर केले. संकटाची जाणीव होताच किम जोंग उन यांनी पॉलिटब्युरोची बैठक घेतली आणि देशात महामारी आणीबाणी लागू करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. 

उत्तर कोरियात लॉकडाऊन काळात नेमके काय निर्बंध लागू होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र उत्तर कोरियात लॉकडाऊन लागू केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी