Cold Wave in Northwest India उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट

Northwest India is in the grip of cold wave no relief for the next three days said IMD : उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट पसरली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या सर्व भागांमध्ये थंडीची लाट आहे.

Northwest India is in the grip of cold wave
उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट 
थोडं पण कामाचं
  • उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट
  • २१ डिसेंबर २०२१ पर्यंत थंडीची लाट
  • उत्तराखंडच्या काही भागांत तसेच पंजाब आणि हरयाणात २३ आणि २४ डिसेंबर पर्यंत दररोज दाट धुकं पडण्याची शक्यता

Northwest India is in the grip of cold wave no relief for the next three days said IMD : नवी दिल्ली : उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट पसरली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या सर्व भागांमध्ये थंडीची लाट आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

वायव्य भारतात (Northwest India) सर्वाधिक थंडी राजस्थानमधील चुरू येथे आहे. चुरू येथे पारा शून्याच्या खाली घसरला आणि उणे २.६ अंश से. तापमानाची नोंद झाली. सीकर येथे उणे २.५ अंश से. तापमानाची नोंद झाली. अमृतसरमध्ये उणे ०.५ अंश से. तापमानाची नोंद झाली. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१ डिसेंबर २०२१ पर्यंत पंजाब, हरयाणा, राजस्थानचा उत्तरेकडील भाग, उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग आणि मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग येथे थंडीची लाट असेल. भारताच्या काही भागांमध्ये थंडीची तीव्र लाट असेल. काही ठिकाणी थंडीच्या लाटेमुळे २१ डिसेंबर पर्यंत दररोज दाट धुकं पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या काही भागांत तसेच पंजाब आणि हरयाणात २३ आणि २४ डिसेंबर पर्यंत दररोज दाट धुकं पडण्याची शक्यता आहे.

भारताच्या उत्तरेपासून पश्चिमेपर्यंतच्या मैदानी परिसरात मंगळवार २२ डिसेंबरपर्यंत ताशी १५ किमी वेगाने थंड आणि कोरडे वारे वाहतील. यामुळे थंडीची तीव्रता वाढेल. दृश्यमानतेत घट होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी