Nostradamus Predictions 2022 | तुम्ही जाणून घ्याव्यात अशा २०२२ या वर्षासाठीच्या नॉस्ट्राडेमस-बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या

Predictions for 2022: नॉस्ट्रेडेमस हा फ्रान्सचा नागरिक होता. त्याने प्रत्येक वर्षासाठीच्या भविष्यवाण्या या पुस्तकात दिलेल्या आहेत. नॉस्ट्राडेमसच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्याचे काहींचे मत आहे. २०२२मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी (Global Pandemic)यासारखी संकटे येतील अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केली असल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकजण या भविष्यवाणीला कोरोना महामारीशी जोडून पाडत आहेत. आगामी वर्षासाठीदेखील नॉस्ट्राडेमसने धक्कादायक भविष्यवाण्या (Predictions of Nostradamus) केल्या आहेत.

Nostradamus Predictions for year 2022
२०२२ साठी नॉस्ट्राडेमसच्या मोठ्या भविष्यवाण्या 
थोडं पण कामाचं
  • नॉस्ट्राडेमसच्या शतकांपूर्वी आपल्या लेस प्रोफेटिस या प्रसिद्ध पुस्तकात अनेक भविष्यवाण्या
  • २०२२ साठी नॉस्ट्राडेमसच्या मोठ्या भविष्यवाण्या
  • जगभर होणार मोठा विध्वंस

Nostradamus Predictions 2022: नवी दिल्ली : जगविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस (Nostradamus)याने काही शतकांपूर्वी आपल्या लेस प्रोफेटिस या प्रसिद्ध पुस्तकात अनेक भविष्यवाण्या (Future predictions) केल्या होत्या. नॉस्ट्रेडेमस हा फ्रान्सचा नागरिक होता. त्याने प्रत्येक वर्षासाठीच्या भविष्यवाण्या या पुस्तकात दिलेल्या आहेत. नॉस्ट्राडेमसच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्याचे काहींचे मत आहे. २०२२मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी (Global Pandemic)यासारखी संकटे येतील अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केली असल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकजण या भविष्यवाणीला कोरोना महामारीशी जोडून पाडत आहेत. आगामी वर्षासाठीदेखील नॉस्ट्राडेमसने धक्कादायक भविष्यवाण्या (Predictions of Nostradamus) केल्या आहेत. काय काय आहेत त्या भविष्यवाण्या. (Nostradamus Predictions for year 2022, see the details)

नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्या- 

प्रचंड आणि अभूतपूर्व महागाई- नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगभर जबरदस्त महागाई येणार आहे आणि अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरणार आहे. २०२२ मध्ये सोने, चांदी, बिटकॉइन यामधील गुंतवणुकीलाच संपत्ती समजले जाईल आणि यातील गुंतवणुकीत मोठी वाढ होईल.

  1. बाबा वेंगा हा एक बल्गेरियन फकीर होता. त्यांनीदेखील अनेक भविष्यवाण्यात केल्या होत्या. बाबा वेंगानुसार २०२२ मध्ये मोठी महामारी येणार असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल. शिवाय २०२२ मध्ये जगभरात अनेक नैसर्गिक संकटे येणार आहेत. यात प्रचंड पूर, सुनामी यासारख्या संकटांचा समावेस आहे. भूकंपाचादेखील उल्लेख आहे. 
  2. बाबा वेंगाने सायबेरियामध्ये बर्फात दडलेला विषाणू वैज्ञानिक शोधून काढतील अशी भविष्यवाणी केली आहे.
  3. पृथ्वीवर अवकाशातून संकट- नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये पृथ्वीवर खूप मोठी अशनी किंवा उल्का धडकणार आहे. यामुळे मोठा विध्वंस होईल. हा अशनी समुद्रात कोसळणार असून त्यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतील आणि जगभरतील समुद्रात मोठे वादळ तयार होईल. या लाटांमुळे मोठे नुकसान होऊ शकेल.
  4. मोठा अणुस्फोट-नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार पुढीलवर्षी एक भयानक अणुस्फोट होईल आणि यामुळे पर्यावरणात मोठा बदल होईल. याचा पृथ्वीवर विपरित परिणाम होईल.
  5. पृथ्वी होणार अंधारमय-नॉस्ट्राडेमसनुसार २०२२ मध्ये आधी भयंकर विध्वंस येईल आणि मग शांतता येईल. पृथ्वी ३ दिवसांसाठी अंधारात बुडून जाईल. या तीन दिवसांत पृथ्वीवर आमुलाग्र बदल होतील. मानवजातीतून आधुनिकता नष्ट होईल.
  6. भयंकर वादळ-नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये फ्रान्समध्ये एक भयंकर वादळ येईल. याचा परिणाम होत जगभरातील अनेक भागात, दुष्काळ, आग आणि पुर अशा परिस्थिती निर्माण होतील. या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगात उपासमार होईल.
  7. आर्टिफिशियल इंटेलजिन्सचे संकट-नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये कॉम्प्युटर मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवण्याएवढे सक्षम होतील. रोबोट मानव जातील नष्ट करतील.

नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांबद्दल कायमच चर्चा होत आली आहे. जगभरात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घटनांना नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाण्यांशी जोडून पाहण्यात आले आहे. काही जणांना नॉस्ट्राडेमसच्या सर्व भविष्यवाण्यांवर विश्वास आहे तर काही जण नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाण्यांना फारसे गांभीर्याने घेत नाहीत. नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्या कोणी, गांभीर्याने घेवो किंवा न घेवो, मात्र नॉस्ट्राडेमस हा कायमच चर्चेत असतो. आबालवृद्धांपासून सर्वानाच त्याच्या बद्दल एक गूढ कुतुहल वाटत असते. अर्थात या भविष्यवाण्यांबद्दल अधिकृतरित्या मात्र कोणालाच सांगता येत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी