मुंबई : चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे परिस्थिती अनियंत्रित आहे. मात्र, केवळ चीनमध्येच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असे नाही. दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका आणि ब्राझीलमध्येही कोरोनाने जोर पकडला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या कोविड-19 प्रतिसाद पथकातील एपिडेमियोलॉजिस्ट मारिया व्हॅन केरखोव्ह यांच्या मते, जगभरात दर आठवड्याला आठ हजार ते १० हजार लोक कोरोनामुळे मरत आहेत. (Not only China, the speed of corona is fast in these 4 countries too! Government of India Alert)
जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे साथीच्या आजाराचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सतर्क झाले आहे. भारत सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंगकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
जगभरात कोविडचा उद्रेक लक्षात घेता, भारत सरकारनेही एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य सचिव राजीव भूषण यांनी सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
अधिक वाचा : Viral Video : संकटात सापडलेल्या आईला चिमुरड्याने वाचवले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी कोरोनावर बैठक आहे. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी देशातील सर्व आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भारत सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर कोविड चाचणी आणि स्क्रीनिंग करण्याचे आदेश दिले आहेत.