Lockdown Latest News: महाराष्‍ट्रच नाही तर या राज्यांनाही सतावत आहे लॉकडाऊनची चिंता, कोरोनाचा कहर

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 11, 2021 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Covid-19 Lockdown: कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेता महाराष्ट्रावर लॉकडाऊनचा धोका कायम आहे. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर दिल्ली, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही परिस्थिती गंभीर होत आहे.

Mask
महाराष्‍ट्रच नाही तर या राज्यांनाही सतावत आहे लॉकडाऊनची चिंता, कोरोनाचा कहर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • कोरोनाच्या संसर्गाच्या प्रसाराचा वेग धडकी भरवणारा
 • महाराष्‍ट्रात लॉकडाऊन लावला जाण्याची दाट शक्यता
 • दिल्लीत कोरोनाबरोबरच कडक निर्बंधही वाढते

कोरोना विषाणूच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेने (second wave) देशातील अनेक राज्यांची (states) परिस्थिती वाईट केली आहे. आरोग्य यंत्रणेवर (health infrastructure) दबाव (pressure) वाढतच आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कडक लॉकडाऊन (strict lockdown) लावला जाण्याची दाट शक्यता (possibility) वर्तवली जात आहे. दिल्लीत (Delhi) रात्रीची संचारबंदी (night curfew) लावण्यात आली आहे तसेच नियमही कडक (strict rules) करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अनेक जिल्ह्यांमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त नवबाधितांची भर पडली आहे. हा आकडा पहिल्या लाटेच्या तुलनेत साधारण 52 हजारांनी जास्त आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी राज्यांना कडक पावले उचलावी लागत आहेत.

कोरोनाच्या संसर्गाच्या प्रसाराचा वेग धडकी भरवणारा

 • गेल्या 24 तासांत कोरोनाच्या विक्रमी 1,52,879 नवबाधितांची नोंद झाली आहे.
 • एकूण बाधितांची संख्या 1,33,58,805वर पोहोचली आहे.
 • सध्या एकूण 11,08,087 लोक संसर्गबाधित आहेत जे एकूण बाधितांच्या संख्येच्या 8.29 टक्के आहे. सक्रीय रुग्णसंख्या पहिल्यांदाच 11 लाखांच्या वर गेली आहे.
 • कोरोनामुक्त होणाऱ्यांचा दर कमी होऊन 90.44 टक्क्यांवर आला आहे.
 • गेल्या 24 तासांत 839 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 1,69,275 झाली आहे.
 • 18 ऑक्टोबर 2020नंतर एका दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची ही संख्या सर्वाधिक आहे.

महाराष्‍ट्रात लॉकडाऊन लावला जाण्याची दाट शक्यता

कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता वाढते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच रविवार टास्क फोर्सटी विशेष बैठक आहे. यानंतर सोमावरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही एक बैठक घेणार आहेत. राज्यात 8 किंवा 15 दिवसांचा लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता आहे. शनिवारी महाराष्ट्रात 55,441 नवबाधित आढळले तर 309 मृत्यू झाले. तर मुंबईत 9327 नवबाधित आढळले तर 50 लोकांचा मृत्यू झाला.

दिल्लीत कोरोनाबरोबरच कडक निर्बंधही वाढते

दिल्लीत शनिवारी कोरोना विषाणूच्या 7,897 नवबाधितांची भर पडली. इथे संसर्गाचा दर यावर्षी पहिल्यांदा 10%च्या पलीकडे गेला. इथे सध्या कोव्हिड-19चे एकूण 7,14,423 बाधित समोर आले आहेत. गेल्या 24 तासांत 39 जणांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 11,235 झाली आहे. दिल्ली सरकारने सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सर्व शाळा, प्रशिक्षणकेंद्रे आणि महाविद्यालये बंद आहेत. मेट्रोंमध्ये 50 टक्के क्षमतेने प्रवास करण्याची अनुमती आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध, रात्रीची संचारबंदी

 • गोरखपुर जिल्ह्यात प्रशासनाने रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्ये याआधीच नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.
 • कर्फ्यूमध्ये भारत सरकार और राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी आणि आवश्यक सेवा आणि लोककल्याणकारी सेवांमध्ये काम करणाऱ्यांना कामासाठी सूट दिली जाईल.
 • बांदा शहरातही शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 • बलियामध्ये जिल्हाधिकारी  अदिती सिंह यांनी रात्री 9 ते सकाळी 6पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
 • मथुरा जिल्हा प्रशासनाने मास्कशिवाय जिल्ह्याच्या मंदिरांमध्ये लोकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी