मोठी बातमी : आता घरच्या घरीच शक्य होणार कोरोनाचा इलाज, तोही फक्त एका गोळीने?

अद्याप या औषधाची पहिल्या टप्प्यावरची चाचणी अमेरिका आणि बेल्जियममध्ये सुरू आहे. यात 18 ते 60 या वयोगटातील 60 निरोगी व्यक्ती आहेत. याची चाचणी जनावरांवर झाली आहे ज्यात कोणतीही वैद्यकीय जोखीम आढळली नाही.

Pfizer company
आता घरच्या घरीच शक्य होणार कोरोनाचा इलाज, तोही फक्त एका गोळीने?  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • भविष्यात फक्त एका गोळीने कोरोनाचा इलाज करणे शक्य?
  • कोरोनाची लस बनवणाऱ्या फायजरचे आणखी एक उत्पादन
  • फक्त एका गोळीने कोरोनाचा उपचार करण्याचा कंपनीचा दावा

corona virus treatment pill । नवी दिल्ली: जगभऱात (World) हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा (corona virus) इलाज (treatment) फक्त एका गोळीने (pill) होण्याच्या शक्यता (possibilities) भविष्यात (future) निर्माण होण्याचा अंदाज आहे. कोरोनाची लस (corona vaccine) तयार करणाऱ्या फायजर (Pfizer) कंपनीने आता संसर्गबाधितांच्या (infected people) उपचारांसाठी (treatment) औषधही (medicine) तयार केले आहे. फक्त एका गोळीने उपचार करण्याचा दावा (claim) या कंपनीने केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या (Times of India) रिपोर्टनुसार (report) सध्या याला PF-07321332 असे नाव देण्यात आले आहे. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या (clinical trials) सुरू आहेत आणि या जर यशस्वी झाल्या तर घरच्या घरीच अनेक लोक बरे होतील आणि त्यांना रुग्णालयात (hospital) जाण्याची गरजच भासणार नाही.

औषधाच्या पहिल्या टप्प्यावरील चाचण्या आहेत सुरू

या औषधाच्या पहिल्या टप्प्यावरील चाचण्या सध्या अमेरिका आणि बेल्जियममध्ये सुरू आहेत. यात 18 ते 60 या वयोगटातील 60 निरोगी व्यक्ती आहेत. याची चाचणी जनावरांवर झाली आहे ज्यात कोणतीही वैद्यकीय जोखीम आढळली नाही.  

असे करते काम हे औषध

माध्यमांच्या बातम्यांनुसार हे औषध एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अँटीरेट्रोव्हायरलसारखे औषध आहे. हे औषध शरीरात विषाणूचा स्तर इतका कमी करते की त्याला ओळखता येत नाही. यामुळे व्हायरस वाढू शकत नाही आणि इतर लक्षणांवरचे उपचार घेऊन रुग्ण बरा होऊ शकतो. एचआयव्हीशिवाय पांढऱ्या काविळीच्या उपचारांसाठीही याच तत्वावर तयार करण्यात आलेल्या औषधाचा वापर होतो.

कमी लोकांवर चाचणी घेण्याचे हे आहे कारण

फायजरने सांगितले आहे की हे औषध SARS-CoV-2सह इतर प्रकारच्या कोरोना विषाणूंवरही परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात जर कोरोना विषाणूचे नवे रूप आले तरीही हे औषध काम करेल. कंपनीचे म्हणणे आहे की पहिल्या टप्प्यावरील चाचण्या या निरोगी लोकांवर केल्या जात आहेत कारण आपले शरीर हे औषध किती प्रमाणात झेलू शकते याचा अभ्यास केला जात आहे. जर सर्वकाही ठीक राहिले तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये मोठ्या संख्येने लोकांचा समावेश केला जाईल. सध्या मात्र हे सांगणे कठीण आहे की हे औषध बाजारात कधीपर्यंत उपलब्ध होईल.

इंजेक्शनच्या डोसचीही सुरू आहे चाचणी

तोंडातून घेतल्या जाऊ शकणाऱ्या गोळीशिवाय फायजर कंपनी इंजेक्शनद्वारे घेतल्या जाणाऱ्या डोसच्याही चाचण्या घेत आहे. याला PF- 07304814 असे नाव देण्यात आले आहे. याची पहिल्या टप्प्यावरील मल्टीडोस चाचणी सुरू आहे. हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांना दिले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी