आता गर्भधारणा रोखण्याची काळजी महिलांना राहणार नाही, पुरुषांसाठी आली ‘गोळी’

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 26, 2021 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

गर्भधारणा टाळण्याची काळजी आता महिलांनाच करावी लागणार नाही. पुरुषांनाही आता गर्भनिरोधाचा नवा मार्ग मिळाला आहे. ब्रिटनमध्ये अशा जेलची चाचणी पूर्ण झाली आहे जे जोडीदाराची संभाव्य गर्भधारणा रोखू शकते.

Couple life
आता गर्भधारणा रोखण्याची काळजी महिलांना राहणार नाही, पुरुषांसाठी आली ‘गोळी’ 
थोडं पण कामाचं
  • गर्भनिरोधक जेलच्या चाचणीत घेतला भाग
  • खांदे आणि छातीवर लावले जाते हे जेल
  • एडची जोडीदारही आहे जेलमुळे खुश

गर्भधारणा (Pregnancy) टाळण्याची काळजी आता महिलांनाच (women) करावी लागणार नाही. पुरुषांनाही (men) आता गर्भनिरोधाचा (contraceptives) नवा मार्ग मिळाला आहे. ब्रिटनमध्ये (Britain) अशा जेलची (gel) चाचणी (trial) पूर्ण झाली आहे जे जोडीदाराची संभाव्य गर्भधारणा रोखू शकते. हे जेल लावल्यानंतर 99 टक्के शुक्राणूंची (sperm) निर्मिती (creation) होण्याची प्रक्रिया काही काळासाठी बंद (seize) होते. पुरुष जेव्हा वाटेल तेव्हा या जेलचा वापर थांबवून पुन्हा शुक्राणूंची निर्मिती करण्यासाठीही सक्षम राहतात.

गर्भनिरोधक जेलच्या चाचणीत घेतला भाग

डेली मेलच्या बातमीनुसार 32 वर्षीय एडने या चाचणीत भाग घेतला होता. यात त्याची 30 वर्षीय जोडीदार फिओना हिने त्याला साथ दिली. हे जेल लावल्याने नको असलेली गर्भधारणा रोखण्यास मदत झाली, पण यामुळे वजन वाढण्याचे आणि हॉट फ्लॅश होण्याचे दुष्परिणामही पाहायला मिळाल्याचे एडने सांगितले आहे. त्याने एका रुग्णालयाच्या बाहेर या जेलच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांची गरज असल्याची जाहिरात पाहिली आणि यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

खांदे आणि छातीवर लावले जाते हे जेल

रोज आंघोळ केल्यानंतर एड आपल्या खांद्यांवर आणि छातीवर हे जेल लावतो आणि काही वेळाने कपडे परिधान करतो. या जेलच्या वैद्यकीय चाचणी करणाऱ्या पथकातील डॉ. जॉन रेनॉल्ड्स यांनी सांगितले आहे की प्रति मिलिलीटर सीमनमध्ये एक मिलियनपर्यंत शुक्राणू असतात. हे जेल लावल्यानंतर टेस्टिसमध्ये साधारण 99 टक्के शुक्राणू निर्मिती थांबली. तसेच त्यांच्या कामजीवनावरही  या जेलचा काहीही परिणाम झाला नाही.

एडची जोडीदारही आहे जेलमुळे खुश

हे जेल बनल्यामुळे एडची जोडीदार फिओनाही खुश आहे. हे दोघे गेल्या 8 वर्षांपासून एकत्र आहेत. तिचे म्हणणे आहे की याआधी शारीरिक संबंध ठेवताना नको असलेल्या गर्भधारणेची चिंता वाटत असे. पण आता या जबाबदारीत एडही तिच्यासोबत आहे याचा तिला आनंद आहे. फिओना सांगते की एड गेल्या एका वर्षापासून जेलचा वापर करत आहे. यामुळे सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण नंतर त्यांचे कामजीवन आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी