धक्कादायक! NRI व्यक्तीला पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवण्यासाठी ८० लाखांच्या जामिनावर अमेरिकेला जाण्याची परवानगी

NRI accused | अमित सुरेशमल लोढा हे अनिवासी भारतीय मुंबईत राहतात. त्यांच्यावर रेवाडी येथे एक फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यावर खटला सुरू आहे. लोढा यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्या याचिकेवरील सुनावणीत बेंचने म्हटले की प्रत्येक व्यक्तीला आपल्या पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर मुलाला भेटण्याचाही अधिकार आहे. आरोपीविरुद्ध एक फसवणुकीचा खटला प्रलंबित असला तरी त्याला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही.

NRI Accused & Bail of Rs 80 lakhs
अनिवासी भारतीयाला पत्नीशी संबंध ठेवण्यासाठी ८० लाखांचा जामीन 
थोडं पण कामाचं
  • रेवाडी येथे फसवणुकीचा गुन्हा असलेला आरोपी
  • आरोपीची पत्नी आणि मुलगा अमेरिकेत
  • पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवण्यासाठी आरोपीला ८० लाखांचा जामीन

NRI accused | चंदीगड : रेवाडी येथे फसवणुकीच्या प्रकरणाचा खटला सुरू असलेल्या एका अनिवासी भारतीयाला (NRI)आपल्या पत्नीशी वैवाहिक संबंध (Relationship with wife) ठेवण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab & Haryana High court) अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली आहे. यासाठी उच्च न्यायालयाने ८० लाख रुपयांचा जामीन जमा (Bail of Rs 80 Lakhs) करण्याचा देण्याचा आदेश दिला आहे. न्यायमुर्ती विकास बहल यांनी हा आदेश अमित सुरेशमल लोढाद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर दिला आहे. ही अनिवासी भारतीय व्यक्ती सध्या मुंबईत राहते. याआधी लोढा यांनी जिल्हा न्यायालयाकडे अमेरिकेला जाण्याची (Permission to visit America) परवानगी मागितली होती, मात्र त्यांची मागणी नाकारण्यात आली होती. (Punjab & Haryana High court granted a bail of Rs 80 lakhs to NRI to have relationship with wife in America) 

मुंबईतील व्यक्तीविरोधात रेवाडीत सुरू होता खटला

अमित सुरेशमल लोढा हे अनिवासी भारतीय मुंबईत राहतात. त्यांच्यावर रेवाडी येथे एक फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यावर खटला सुरू आहे. लोढा यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्या याचिकेवरील सुनावणीत बेंचने म्हटले की प्रत्येक व्यक्तीला आपल्या पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर मुलाला भेटण्याचाही अधिकार आहे. आरोपीविरुद्ध एक फसवणुकीचा खटला प्रलंबित असला तरी त्याला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. मात्र खटल्यातील सुनावणीच्या वेळेस त्याच्या उपस्थितीची खात्री असावी यासाठी त्याला ४०-४० लाख रुपयांचे दोन जामीन द्यावे लागतील.

खालच्या कोर्टाकडून परदेशात जाण्याची मागणी फेटाळली

लोढा याने रेवाडी न्यायालयाने १६ डिसेंबर २०२०ला दिलेल्या आदेशाला रद्द करण्याची मागणी केली होती. या आदेशात त्याला ३० दिवसांसाठी अमेरिकेला जाण्याची आणि त्याचा पासपोर्ट त्याला परत देण्याची मागणी फेटाळण्यात आली होती. लोढावर फसवणुकीचे एक प्रकरण रेवाडी जिल्ह्यातील धारूहेडा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आले आहे. सध्या लोढा याला अंतरिम मिळालेला होता आणि तो तपासातदेखील सहभागी होता. मात्र त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्यात आला होता.

लोढाचे कुटुंब अमेरिकेत

लोढाच्या म्हणण्यानुसार त्याचे लग्न एका अमेरिकन तरुणीशी झाले आहे. या दांपत्याला एक मुलगा आहे आणि तो जन्माने अमेरिकन नागरिक आहे. लोढाने आपल्या पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवण्यासाठी आणि आपल्या मुलाल भेटण्यासाठी अमेरिकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला होता की भारताच्या प्रत्येक नागरिकाचा हा मूलभूत अधिकार आहे. सरकारकडून युक्तिवाद करण्यात आला होता की जर आरोपीला वैवाहिक संबंध ठेवायचे आहेत आणि त्याला पत्नी आणि मुलाला भेटायचे आहे तर तो त्यांना भारतात बोलावू शकतो. यावर आरोपीकडून युक्तिवाद करण्यात आला की तो ग्रीनकार्डधारक आहे. ग्रीनकार्ड नियमित करण्यासाठी त्याचे अमेरिकेला जाणे आवश्यक आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी