BIG BREAKING: एनएसई फोन टॅपिंग प्रकरण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

Former Mumbai police commissioner Sanjay Pandey arrested by ED: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे.

Lucknow
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक 
थोडं पण कामाचं
  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक
  • ईडीने केली अटकेची कारवाई

Sanjay Pandey arrest by ED in NSE scam case मुंबई : एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. एनएसई घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. संजय पांडे यांना चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते त्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. उद्या संजय पांडे (Sanjay Pandey) यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. (ED arrest former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)

एनएसई घोटाळा प्रकरणात ईडीने दिल्लीतील मुख्य कार्यालयात तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर आज चौकशी झाल्यावर संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. एनएसईमध्ये जो घोटाळा झाला होता त्यात संजय पांडे यांच्या कंपनीचा समावेश असल्याचा आरोप होता. तसेच संजय पांडे यांच्या कंपनीकडून एनएसईच्या काही अधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. यासोबतच एनएसईमध्ये जी क्रिमिनल कॉन्सरन्सी रचली होती त्यात सुद्धा पांडे यांच्या आयटी कंपनीच्या माध्यमातून मोठी मदत झाल्याचा आरोप होता. त्या अनुषंगाने ईडी आणि सीबीआय दोघांकडून तपास सुरू होता.

हे पण वाचा : उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले 50 लाखांचे टार्गेट

संजय पांडेंवर आरोप काय? 

संजय पांडे यांनी पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर पांडे यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरू केली. २००६ मध्ये संजय पांडे पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले. तेव्हा आई आणि मुलाला संचालक केलं. पांडे यांच्या कंपनीला एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरलं. त्याच दरम्यान २००९ ते २०१७ या कालावधीत पांडेंकडून अवैधरित्या एनएसईमधली कर्मचाऱ्यांचं कथितपणे फोन टॅपिंग केलं. 
या कालावधीत फोन टॅपिंग करण्यासाठी संजय पांडे यांच्या आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीला ४.४५ कोटी रुपये मिळाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी