CUET UG Exam City Slip and Admit Card 2023: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा, CUET UG 2023 परीक्षा मे मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA द्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. CUET 2023 च्या वेळापत्रकानुसार, CUET 2023 परीक्षेची सिटी स्लिप 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांची CUET UG परीक्षा सिटी स्लिप तपासू आणि डाऊनलोड करू शकतात. (nta cuet ug exam 2023 city slip and admit card date to be release on official website)
अधिक वाचा : पोटातील गॅस दूर करण्यासाठी तयार करा ही घरगुती पावडर
NTA द्वारे 21 ते 31 मे 2023 या दरम्यान वेगवेगळ्या तारखांना CUET 2023 ची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा विविध टप्प्यामध्ये घेतली जाणार असून, त्या विषयांनुसार उमेदवारांना परीक्षेच्या तारखा आणि स्लॉटचे वाटप केले जाणार आहे.
CUET परीक्षेचे वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे, त्यानुसार उमेदवारांना त्यांच्या परीक्षेची तारीख आणि वेळ CUET प्रवेशपत्राद्वारे तपासता येईल.
अधिक वाचा : महाराष्ट्र बोर्ड परीक्षेच्या निकालाची घोषणा...
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात CUET 2023 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले जाईल, तर सीटी स्लिप 30 एप्रिल रोजी जाहीर होत आहे. सिटी स्लिपद्वारे उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी नेमलेले शहर कळेल आणि त्यानुसार प्रवासाची व्यवस्था केली जाईल. पात्र उमेदवार त्यांचा CUET अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून त्यांची परीक्षा सूचना स्लिप तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी भारतातील सर्व केंद्रीय विद्यापीठ (CUs) आणि इतर सहभागी विद्यापीठांमध्ये संगणकीय परीक्षा (CBT) प्रक्रियेद्वारे पदवी कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी CUET UG, संपूर्ण भारतात एकूण 13 माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे.