NEET Answer key 2020: एनटीएने प्रसिद्ध केली २०२०ची उत्तरपत्रिका, nta.ac.inवरून विद्यार्थी घेऊ शकतात माहिती

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 26, 2020 | 21:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

परीक्षार्थींच्या मदतीसाठी एनटीएने नीट २०२०ची उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी मागील वर्षाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कट-ऑफबद्दलही माहिती मिळवू शकतील.

NEET 2020
एनटीएने प्रसिद्ध केली २०२०ची उत्तरपत्रिका, nta.ac.inवरून विद्यार्थी घेऊ शकतात माहिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एनटीएने प्रसिद्ध केली नीट २०२०ची उत्तरपत्रिका
  • nta.ac.inवरून विद्यार्थी घेऊ शकतात मागील वर्षाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कट-ऑफबद्दलही माहिती
  • १३ सप्टेंबर २०२० रोजी देशभरात झाली होती नीटची परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) (National Testing Agency) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (official website) नीट २०२०ची (NEET 2020) उत्तरपत्रिका (answer key) प्रसिद्ध केली आहे. ज्या परीक्षार्थींनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (National Eligibility Entrance Test) (नीट) २०२० दिली होती ते एनटीएच्या nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून ही उत्तरपत्रिका मिळवू शकतील. ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी देशभरात झाली होती.

सर्व सेट्ससाठी उत्तरपत्रिका प्रसिद्ध

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने E1-E6, F1-F6, G1-G6, H1-H6 यासह सर्व सेट्सच्या उमेदवारांसाठी उत्तरपत्रिका अपलोड केल्या आहेत. ज्यांना आपल्या उत्तरपत्रिकांबाबत काही शंका आहे ते यावर आक्षेप नोंदवू शकतात. लवकरच यासाठीची विंडो खुली होईल. परीक्षार्थींना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले आक्षेप नोंदवावे लागतील. यासाठीचे शुल्क १,०००/- प्रति आक्षेप असे असेल.

निकालानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी वेगळी नोटीस

नोटिसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कृपया लक्ष द्या की ही सार्वजनिक सूचना त्या उत्तरपत्रिकांवरील आक्षेप नोंदवण्यासाठी नसून ती नोटिस नंतर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे या उत्तरपत्रिकांबाबत आपल्या प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरणे देऊ नयेत आणि संबंधित प्रक्रिया चालू होण्याची प्रतीक्षा करा. इथे पाहा संपूर्ण नोटिस.

NEET उत्तरपत्रिका २०२०: कशा डाऊनलोड कराल

  1. NTA NEETच्या nta.ac.in या संकेतस्थळावर जा.
  2. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नोटिसवर क्लिक करा आणि उत्तरपत्रिका थेट डाऊनलोड लिंकवरून डाऊनलोड करा.
  3. आक्षेपासाठीची विंडो नंतर खुली केली जाईल, त्यामुळे परीक्षार्थींना सूचना देण्यात येत आहे की सध्या त्यांनी फक्त आपली उत्तरे तपासावीत.
  4. अधिकृत नोटिसमध्ये लिहिले आहे, ‘उमेदवारांना सांगण्यात येत आहे की त्यांनी याच माध्यमातून जावे आणि स्वतःला ड्राफ्ट उत्तरपत्रिकेच्या आव्हानासाठी तयार करावे, जी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.’ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देशभरातील उत्तम वैद्यकीय महाविद्यालयांच्या कट-ऑफचीही माहिती घेऊ शकतात.

निकाल तयार करण्याचे कार्य सुरू

NEET २०२०चा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच हे निकाल प्रसिद्ध होतील. परीक्षेसाठी उपस्थित असलेले उमेदवार आपले ठिकाण, रँक, गुण यावरून भारतातील टॉप १० वैद्यकीय महाविद्यालयांची माहिती घेऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी