NTRO: सर्जिकल स्ट्राईकचे हीरो धस्माना बनले सरकारच्या ‘तिसऱ्या डोळ्या’चे प्रमुख

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 19, 2020 | 15:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Anil Dhasmana: चीनच्या कुरापती पाहता खासकरून भारताच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारी एनटीआरओवर सोपवण्यात आली आहे आणि याची कमान सर्जिकल स्ट्राईकचे हीरो अनिल धस्माना यांना देण्यात आली आहे.

Anil Dhasmana and Amit Shas
NTRO: सर्जिकल स्ट्राईकचे हीरो धस्माना बनले सरकारच्या ‘तिसऱ्या डोळ्या’चे प्रमुख  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सर्जिकल स्ट्राईकच्या हीरोच्या हाती एनटीआरओची कमान
  • या गुप्तयंत्रणेने बालाकोट हवाई हल्ल्यात पार पाडली होती महत्वाची भूमिका
  • एनटीआरओ देशाला तांत्रिक सहाय्य देऊन त्याला या क्षेत्रात मजबूती देते

नवी दिल्ली: तांत्रिक बाबींमध्ये (Technical front) देशाला मजबूत सुरक्षा (strengthening India) देणाऱ्या एनटीआरओ (NTRO) म्हणजेच राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Institute) जितकी जास्त ताकदवान होईल तितकीच देशाची शत्रूविरोधातील शक्ती वाढेल. काही काळापूर्वी चीनने भारताच्या (Indo-China border issues) सीमेवर धुमाकूळ घातला होता. भारतीय सैन्याने बालाकोटमध्ये (Balakot air strike) पाकिस्तानला (Pakistan) शिकवलेला धडा ते विसरले. एनटीआरओ ही तीच संस्था आहे जिने बालाकोट हवाई हल्ल्याच्या वेळी एक-एक गुप्त माहिती भारताला दिली होती. चीनच्या या कुरापतींना लगाम घालण्यासाठी अनिल धस्माना (Anil Dhasmana) यांना सरकारचा तिसरा डोळा असलेल्या एनटीआरओचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था म्हणजेच एनटीआरओ देशाची एक गुप्तचर संस्था आहे जी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या अधीन राहून काम करते. याची स्थापना २००४मध्ये झाली होती. भारत-चीन सीमावादावर नजर ठेवण्यासाठी आता एनटीआरओ महत्वाची भूमिका बजावत आहे.

कशी काम करते एनटीआरओ?

एनटीआरओ पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करते. ही संस्था देशाला तांत्रिक सहाय्य देऊन त्याला या क्षेत्रात मजबूती देते. ती शत्रूच्या हालचालीवर उपग्रहांद्वारे नजर ठेवते. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ड्रोन, उपग्रहांच्या माध्यमातून नेहमी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते. एखाद्या ठिकाणी काय हालचाल होते आहे यावर एनटीआरओची नजर कायम असते. देशाला सर्व गुप्त माहिती पुरवण्याची जबाबदारी या संस्थेकडे असते. युद्धाशी संबंधित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या सुरक्षेची जबाबदारी देखील ही संस्था सांभाळते. बालाकोट एअर स्ट्राईकदरम्यान एनटीआरओने गुप्त माहिती आणि उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रांच्या माध्यमातून तीनशेपेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता.

कोण आहेत धस्माना?

अनिल धस्माना १९८१च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म उत्तराखंडमधला असून त्यांचे शिक्षण उत्तर प्रदेशात तर नोकरी मध्य प्रदेशात केली. सीमेवर चीनच्या सुरू असलेल्या कुरापती पाहता पुन्हा एकदा सरकारने आपल्या या कर्तबगार अधिकाऱ्याला मैदानात उतरवले आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या हौतात्म्याचे उत्तर देण्यासाठी करण्यात आलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याच्या आखणीचे नेतृत्व अनिल धस्माना यांनीच केले होते.

काय असते धस्माना यांच्या बाबतीत पाकिस्तानची भूमिका?

अनिल धस्माना हे पाकिस्तानसंबंधीच्या मुद्द्यांचे विश्लेषक आहेत. पाकिस्तानच्या अनेक गोष्टी त्यांना तपशीलवार आणि खोलात माहिती आहेत. पाकिस्तानच्या भविष्यातील हालचालींची कल्पना त्यांच्या सखोल अभ्यासामुळे त्यांना आधीच येते. धस्माना यांचे कार्यक्षेत्र खूप विस्तृत आहे. त्यांनी बलुचिस्तान, अफगाणिस्तानसह इतर अनेक देशांमधील शहरांमध्ये राहून काम केले आहे. आतंकवादाच्या गुंतागुंतीच्या कड्या ते चटकन जोडतात. जेव्हा जेव्हा देशाला काही खास अधिकाऱ्यांच्या मदतीची गरज असते तेव्हा धस्मानांसारखे अधिकारी सदैव तत्पर असतात. देशाच्या गुप्तचरयंत्रणा देशाचे सुरक्षाकडे मजबूत करण्यासोबतच शत्रूवर हल्ला करण्यासही सेनेची मदत करतात.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी