OBC Resrvation: एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा, Supreme Court चे आदेश

 एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) दिले आहेत. ओबीसी आरक्षण (OBC reservation) तात्काळ निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले आहेत.

municipal elections
महापालिका निवडणुका  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) दिले आहेत. तात्काळ निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले आहेत.

मार्च 2020 च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश देत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दणका दिला आहे.जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत.  दरम्यान राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेणार हे पाहून महत्त्वाचे ठरणार आहे. कारण राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न  घेण्याची भूमिका घेतली होती. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी