दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०८ ऑक्टोबर २०१९: शिवसेनेचा दसरा मेळावा ते 'हिरकणी'चं पहिलं गाणं रिलीज

Headlines of the 08 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०८ ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०८ऑक्टोबर २०१९:  आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी आहे ते म्हणजे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लाखो शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मेळाव्यात त्यांनी राम मंदिराचा उल्लेख केला तसंच काँग्रेससह राष्ट्रवादीवर टीका केली. अजित पवार आणि शरद पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. आजची दुसरी बातमी आहे, अमित शहा यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. बीडमधील दसरा मेळाव्याला भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. तिसरी आजची बातमी आहे, सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याची. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र येतील असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधील एका जाहीर कार्यक्रमात केलं आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे. चौथी आजची महत्त्वाची बातमी आहे, वायुसेना दिनाच्या दिवशीच राफेल विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. फ्रान्समध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदा या विमानाची पूजा करून उड्डाण घेतलं. आजची पाचवी बातमी आहे मराठी सिनेमासंदर्भातली. नॅशनल क्रश अभिनेता विकी कौशलकडून आगामी मराठी सिनेमा 'हिरकणी'चं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाची उत्सुकता अधिक ताणली जेव्हा खुद्द विकी कौशलने सिनेमाचं गाणं रिलीज केलं. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

मी सत्तेत होतो, मी सत्तेत आहे आणि उद्याही शिवसेना सत्तेत राहणारः उद्धव ठाकरेः आज शिवसेनेचा दसरा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपलं दमदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी राम मंदिरासह काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही 300 खासदार दिले, आम्ही 370 कलम हटवलंः अमित शहाः बीडमधील दसरा मेळाव्याला भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. सावरगावात दसरा मेळाव्यातून पंकजा मुडे यांनी शक्तिप्रदर्शन केलं. अमित शहांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. बातमी सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

दोन्ही पक्ष थकलेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण लवकरच; सुशीलकुमार शिंदेंचं अतिशय मोठं वक्तव्यः भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र येतील असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधील एका जाहीर कार्यक्रमात केलं आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दसऱ्याच्या मुहूर्तावर राफेल विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भारतीय हवाईदलासाठी 36 राफेल लढाऊ विमानाच्या करारातंर्गत मिळणारं पहिलं विमान स्विकारण्यासाठी फ्रान्समध्ये पोहोचले. त्यांनी पहिल्यांदा विमानातून उड्डाण घेतलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नॅशनल क्रश अभिनेता विकी कौशलकडून मराठी सिनेमा 'हिरकणी'चं पहिलं गाणं रिलीजः आगामी सिनेमा हिरकणी सध्या बराच चर्चेत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासातील ही गाजलेली गोष्ट मोठ्या पडद्यावर उभी राहत आहे. या सिनेमाची उत्सुकता अधिक ताणली जेव्हा खुद्द विकी कौशलने सिनेमाचं गाणं रिलीज केलं. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...