दहावीची परीक्षा देण्यासाठी आले ५८ वर्षांचे आमदार

Odisha 58-year-old BJD MLA Angada Kanhar appears for Class 10th exam 40 years after dropping out of school : ओडिशातील फूलबनीचे बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार अंगद कन्हार ५८व्या वर्षी दहावीची परीक्षा देत आहेत. कौटुंबिक कारणामुळे अंगद कन्हार यांना लहानपणी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते.

Odisha 58-year-old BJD MLA Angada Kanhar appears for Class 10th exam 40 years after dropping out of school
दहावीची परीक्षा देण्यासाठी आले ५८ वर्षांचे आमदार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दहावीची परीक्षा देण्यासाठी आले ५८ वर्षांचे आमदार
  • कौटुंबिक कारणामुळे अंगद कन्हार यांना लहानपणी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते
  • ओडिशात २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू

Odisha 58-year-old BJD MLA Angada Kanhar appears for Class 10th exam 40 years after dropping out of school : भारतात जेव्हा 'सर्व शिक्षा अभियान' सुरू झाले त्यावेळी शिक्षणाचे वय नसते, शिकताना लाजू नये अशा स्वरुपाच्या घोषणा लोकप्रिय झाल्या होत्या. या घोषणा प्रत्यक्षात आणत ओडिशातील फूलबनीचे बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार अंगद कन्हार ५८व्या वर्षी दहावीची परीक्षा देत आहेत. कौटुंबिक कारणामुळे अंगद कन्हार यांना लहानपणी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. ही घटना १९७८ मध्ये घडली. पण आता अंगद कन्हार यांनी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ते त्यांच्या तुलनेत खूप लहान असलेल्या मुलांसोबत दहावीची परीक्षा देत आहेत. 

ओडिशात दहावीची परीक्षा सुरू आहे. पहिला पेपर देण्यासाठी अंगद कन्हार जेव्हा परीक्षा केंद्रावरील त्यांच्या वर्गात आले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. परीक्षा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अंगद कन्हार यांनी त्यांच्या या कृतीमागचे कारण सविस्तरपणे सांगितले. 

मी दहावीत होतो पण कौटुंबिक कारणामुळे शाळा सोडून इतर जबाबदाऱ्यांमध्ये अडकलो. ही घटना १९७८ मध्ये घडली. अलिकडेच मला कळले की प्रौढ शिक्षण व्यवस्थेंतर्गत अनेक पन्नाशी साठीच्या व्यक्तींनी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले आहे. हे कळल्यावर मी पण अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन तयारी केली, असे अंगद कन्हार म्हणाले. 

आमदार अंगद कन्हार यांचे मित्र असलेले एक सरपंच पण दहावीची परीक्षा देत आहेत. अंगद कन्हार आणि त्यांचे सरपंच मित्र या दोघांचे परीक्षा केंद्र ओडिशातील रुजंगी हायस्कूल हे आहे.

ओडिशात शुक्रवार २९ एप्रिल २०२२ पासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा मंगळवार १० मे २०२२ रोजी संपणार आहे. ओडिशात ५.८ लाख विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देत आहेत. यात स्टेट इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूल अर्थात एसआयओएसच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आमदार अंगद कन्हार आणि त्यांचे सरपंच मित्र हे दोघे एसआयओएसचे विद्यार्थी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी