दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० मे २०१९: निकालानंतर बीजेडी या पक्षात सामील होणार ते अक्षय कुमार धर्म संकटात

लोकल ते ग्लोबल
Updated May 20, 2019 | 22:52 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

Daily Top News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० मे २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबईः आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. सध्या देशभरात लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाचे वारे वाहत आहेत. त्यात १९ मे रोजी म्हणजेच निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर सगळीकडून एक्झिट पोल येण्यास सुरूवात झाली. आज दिवसभरात एक्झिट पोलच्या बातम्यानुसार मोठंमोठ्या व्यक्तिंचे आणि मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रीया सुद्धा आल्या. त्यात आज दिवसभरात एक महत्त्वाची बातमी समजली ती बीजेडीच्या संदर्भातली. निकालानंतर बीजेडी कोणत्या पक्षात सामील होणार या संदर्भातले संकेत देण्यात आले आहेत. यानंतरची महत्त्वाची आणि वादग्रस्त बातमी आहे, विवेक ओबेरॉयनं शेअर केलेल्या फोटोसंदर्भातली. विवेकनं असा एक फोटो शेअर केल्या ज्यामुळे त्याला राज्य आणि केंद्रिय महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. तिसरी महत्त्वाची बातमी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  चौथी महत्त्वाची बातमी आहे क्रिडा क्षेत्रातली. युवराज सिंगनं लवकरच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामागची काही कारणं जाणून घ्या. पाचवी आणि महत्त्वाची बातमी मनोरंजन क्षेत्रातली आहे. मोदींच्या मुलाखत घेणारा अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं मोदींची खिल्ली उडवली आहे. जाणून घेऊया या बातम्या सविस्तर रूपात. 

निकालानंतर NDAमध्ये सामील होणार BJD? पक्षाने दिले संकेतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो पक्ष सत्तेत येईल, त्या पक्षासोबत जाणार असल्याचे संकेत बीजेडीने दिले आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीए सत्तेत येणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

विवेक ओबेरॉयनं शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, फॅन्स चिंतेतः विवेक ओबेरॉयनं ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमध्ये विवेकसोबत ऐश्वर्या दिसत आहे.या फोटोमुळे विवेकला ट्रोल करण्यात आलं आहे. यानंतर विवेकला राज्य आणि केंद्रिय महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. यावर विवेकनं दिलेली प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

या दिवशी लागेल दहावी, बारावी निकाल, शिक्षण मंडळ काय सांगते?: शिक्षण तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ किंवा २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या तारखाही बोर्डाच्या आधीच्या निकालांच्या तारखांवरून अंदाजे काढल्या आहेत. बातमीचा मजकूर सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

युवराज सिंग लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यताः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जवळपास बाहेर गेलेला क्रिकेटर युवराज सिंग लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवृत्ती मागची कारणं जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

पत्नी ट्विंकलचे मोदींच्या मेडिटेशनवर ट्विटः मेडिटेशनच्या फोटोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल करणाऱ्या व्यक्तींमध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नाही मागे नाही. पण, ट्विंकलचा पती अक्षय कुमार मोदींचा फॅन असताना ट्विंकलचं ट्विट आश्चर्यकारक आहे. बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० मे २०१९: निकालानंतर बीजेडी या पक्षात सामील होणार ते अक्षय कुमार धर्म संकटात Description: Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...