देशात पेट्रोल-डिझेल का होतंय महाग? पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले कारण

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील १२ दिवसात सातत्याने वाढल्या आहेत. काही राज्यांत त्याने शंभरीही पार केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोरोनाच्या अनुषंगाने अनेक विकासकामांसाठी पेट्रोलवरील करां

oil minister dharmendra pradhan decodes the two main reasons behind sky rocketing fuel prices
देशात पेट्रोल-डिझेल का होतंय महाग?   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • प्रधान म्हणाले की, तेल उत्पादक देश नफ्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करत आहेत. 
  • याचा परिणाम आयातदार देशांवर होऊन भाव वाढत आहेत.
  • प्रधानांनुसार पेट्रोल-डिझेलवरील कर योग्यच, विकासकामांसाठी गरजेचे 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. अशात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, तेल उत्पादक देश नफ्यासाठी उत्पादन कमी करत आहेत. त्यामुळे ही भाववाढ होत आहे. प्रधान रविवारी आसामातील धेमाजी येथे बोलत होते. ते म्हणाले, 'खनिज तेलाचे भाव वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे उत्पादन घटले आहे आणि तेल उत्पादक देश नफा कमवण्यासाठी उत्पादन कमी करत आहेत. याचा परिणाम आयातदार देशांवर होत आहे.'

ते म्हणाले की, ‘आम्ही अशी भाववाढ होऊ नये म्हणून तेल उत्पादक देशांच्या संघटना ओपेक आणि ओपेक प्लस यांच्याशी सतत चर्चा करत आहोत. या परिस्थितीत बदल होतील अशी आशा आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती मागील १२ दिवसात प्रचंड वाढल्या आहेत. काही राज्यांत दर शंभरच्या पार गेले आहेत. प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलवरील करांचं समर्थन करत ते विकास कामांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यातूनच रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले. 

विकासकामांसाठी कर आवश्यक 

प्रधान म्हणाले की, 'याचे आणखी एक कारण कोव्हीडसुद्धा आहे. आपल्याला अनेक विकासकामे करायची आहेत. यासाठीच हा कर गोळा केला जात आहे. याने रोजगारही उपलब्ध होतील. सरकारने आपली गुंतवणूक वाढवली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात खर्च ३४ टक्क्यांनी वाढवला आहे. राज्य सरकारही आपला खर्च वाढवणार आहेत. परंतु, संतुलनही महत्वाचे आहे. माझ्या मते अर्थमंत्री आणि राज्य सरकार यांच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो.' याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामणही शनिवारी केंद्र आणि राज्यांमध्ये चर्चा  होणे गरजेचे असल्याचे म्हणाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी