Ola-Uber Fare Hike : टॅक्सीतून प्रवास करणे झालं महाग! भाड्यामध्ये १५ टक्क्यांपर्यत वाढ

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या भाड्यावर टॅक्सी चालवताना टॅक्सीचालकांचे नुकसान होत आहे. टॅक्सीचे 12 टक्क्यांनी भाडे वाढवले ​​आहे. 

Ola-Uber Fare Hike: Traveling by taxi has become expensive! Rent increase up to 15%
Ola-Uber Fare Hike : टॅक्सीतून प्रवास करणे झालं महाग! भाड्यामध्ये १५ टक्क्यांपर्यत वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली
  • जुन्या भाड्यावर टॅक्सी चालवताना टॅक्सीचालकांचे नुकसान
  • चालकांच्या वाढत्या नाराजीमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे

मुंबई :  महागडे डिझेल-पेट्रोल आणि सीएनजीचा परिणाम टॅक्सी व्यवसायावरही दिसून येत आहे. या महागाईचा परिणाम म्हणजे आता अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा देणाऱ्या Uber (UBER) ने 12 टक्के भाडे (Uber Fare Hike) वाढवण्याची घोषणा केली आहे. (Ola-Uber Fare Hike: Traveling by taxi has become expensive! Rent increase up to 15%)

अधिक वाचा : ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी श्याओमीच्या ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंटने मागितला वेळ

महागाईच्या काळात उबेर आणि ओला या टॅक्सी कंपन्यांनी आधीच अनेक ठिकाणी भाडे वाढवले ​​आहे. पेट्रोल आणि डिझेल तसंच सीएनजीच्या किमतीत नुकत्याच झालेल्या प्रचंड वाढीमुळे उबेर आणि ओलाच्या चालकांनी भाडेवाढीची मागणी केली होती. उबरने अनेक शहरांमध्ये 15 टक्क्यांपर्यंत भाडे वाढवले ​​आहे. ओलानेही भाडे 11 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे.

अधिक वाचा : PPF investment limit : पीपीएफमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा केंद्राचा विचार

यापूर्वी, उबरने मुंबईत १५ टक्के आणि कोलकात्यात १२ टक्क्यांनी भाडे वाढवले ​​होते. अलीकडच्या काही दिवसांत इंधनाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ओला आणि उबरने गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा भाडे वाढवले ​​आहे. याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये दोन्ही कंपन्यांनी भाडे 15 टक्क्यांनी वाढवले ​​होते.

अधिक वाचा : RBI Recruitment 2022: RBI मध्ये ग्रेड बी पदांसाठी मेगाभरती, अर्जासाठी बाकी राहिलेत फक्त 5 दिवस; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
तब्बल साडेचार महिन्यांच्या कालावधीनंतर 22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान 14 हप्त्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांत सीएनजीच्या दरात किलोमागे 15 रुपयांनी वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी