अरे देवा ! आता आणखी एक सापडला नवीन सब-वॅरिएंट.... WHO ने भारताला केले अलर्ट

corona Sub Variant Ba275 Detected : BA.2.75 हे नवीन उप-प्रकार भारतात आढळून आले असून ते 10 देशांमध्ये पसरले आहे. तो किती वेगाने पसरतो हे सांगणे कठीण असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे निश्चित. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, दोन आठवड्यांत जगात कोरोनाची प्रकरणे 30 टक्क्यांनी वाढली आहेत.

Omicron India: 30% cases increased in two weeks, new sub-variant found in India.... WHO Chief's announcement is a matter of concern?
Omicron India: भारतात सापडला नवीन सब-वॅरिएंट.... WHO ने केले अलर्ट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा नवीन उप प्रकार आला आहे
  • BA.2.75 भारत आणि 10 देशांमध्ये पसरला आहे
  • डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, जगात दोन आठवड्यात 30% प्रकरणे वाढली आहेत

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा BA.2.75 हा नवीन उप-प्रकार भारतात आढळून आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले की, भारतासह अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे नवीन उप-प्रकार सापडले आहेत. त्यावर WHO लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'गेल्या दोन आठवड्यांत जगभरात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.' WHO प्रमुखांनी सांगितले की, कोरोनाची लाट BA.4 आणि BA.5 मुळे आली होती. युरोप आणि अमेरिका आहे. भारतासारख्या देशांमध्ये BA.2.75 चे नवीन उप-प्रकार देखील आढळून आले आहे, ज्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. वास्तविक, या नवीन सब-व्हेरियंटबद्दल अजून जास्त माहिती नाही. तो किती वेगाने पसरतो, लक्षणांची तीव्रता काय आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. (Omicron India: 30% cases increased in two weeks, new sub-variant found in India.... WHO Chief's announcement is a matter of concern?)

अधिक वाचा : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, मारेकऱ्याला अटक

आज 18 हजार नवीन रुग्ण वाढले

गुरुवारी देशात कोरोनाचे 18,930 नवीन रुग्ण आढळले. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,19,457 वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण प्रकरणांपैकी 0.26 टक्के आहे तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.53 टक्के आहे. 24 तासांच्या कालावधीत उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,245 ने वाढली.

अधिक वाचा : 

CM एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदी-शहांशी करणार चर्चा; फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?


प्रथम भारतात, नंतर 10 देशांमध्ये प्रकरणे समोर आली

डब्ल्यूएचओचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये सांगितले की, कोरोना विषाणू संसर्गाचा एक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनच्या उप-प्रकाराला ba.2.75 म्हणतात. प्रथम भारतात याची पुष्टी झाली आणि नंतर सुमारे 10 देशांमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली. या उप-प्रकाराचे विश्लेषण करण्यासाठी खूप कमी जीनोम अनुक्रम उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले. या सब-व्हेरियंटमध्ये स्पाइक प्रोटीनच्या 'रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन' वर काही उत्परिवर्तन आहेत, जे 'मानवी रिसेप्टर' पर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे आपल्याला त्यावर लक्ष ठेवावे लागेल. याबाबत काहीही बोलणे घाईचे असल्याचे ते म्हणाले. जगभरात संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ सलग चौथ्या आठवड्यात सुरूच आहे. अहवालानुसार, BA.5 आणि BA.5 च्या केसेसमध्येही सातत्याने वाढ होत आहे. जगभरात, 83 देशांमध्ये BA.5 आणि 73 देशांमध्ये BA.4 ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

अधिक वाचा : 

नामांकित स्कूलमध्ये मोठी दुर्घटना ! मधल्या सुट्टीत डब्बा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले झाड, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

भारतातील नवीन उप-प्रकार

भारताबद्दल बोलायचे झाले तर, दिल्ली, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये आतापर्यंत BA.2.75 प्रकारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे उप-प्रकार नवीन कोरोना लाटा निर्माण करण्यासाठी पुरेसे शक्तिशाली आहे की नाही हे देखील स्पष्ट नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप देशात या नवीन उप-प्रकारच्या उपस्थितीची अधिकृत पुष्टी केलेली नाही. जगभरातील तज्ज्ञ या प्रकरणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देत आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकांनी मास्क घालण्याची सवय विसरू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी