ओमायक्रॉन आहे घातक ! आठवडाभरात जगात दीड कोटी रुग्ण, तर 48 हजार मृत्यू, WHO ची आकडेवारी

Omicron : संपूर्ण जगात सध्या कोरोनाचा (Corona) नवा व्हेरियंट (variant) ओमायक्रॉनने (Omicron) हाहाकार माजवला आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे, सुरुवातील कमी धोकादायक वाटणारा ओमायक्रॉन घातक असल्याचं निदर्शनात येत आहे.

WHO
ओमायक्रॉनचे आठवडाभरात दीड कोटी रुग्ण, 48 हजार मृत्यू  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गेल्या आठवड्यात नवीन कोरोना विषाणू संसर्गाच्या संख्येत सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • 43,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत.
  • ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

Omicron is Dangerous variant :नवी दिल्ली :  संपूर्ण जगात सध्या कोरोनाचा (Corona) नवा व्हेरियंट (variant) ओमायक्रॉनने (Omicron) हाहाकार माजवला आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे, सुरुवातील कमी धोकादायक वाटणारा ओमायक्रॉन घातक असल्याचं निदर्शनात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात नवीन कोरोना विषाणू संसर्गाच्या (contagion) संख्येत सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

मंगळवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिक अहवालात संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने सांगितले की, गेल्या आठवड्यात कोविड-19 संसर्गाची सुमारे 15 दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 43,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, अहवालानुसार मृतांची संख्या स्थिर आहे. त्याचवेळी, आफ्रिका वगळता जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. तर आफ्रिकेत कोविडच्या प्रकरणांमध्ये सुमारे 11 टक्क्यांनी घट झाली आहे.

जगात संक्रमणाची 15 दशलक्ष नवीन प्रकरणे, म्हणून आहे घातक

डब्ल्यूएचओचे महासंचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात, कोरोना संसर्गाची सुमारे 1.5 कोटी प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी एका आठवड्यातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रकरणे आहेत. यापैकी बहुतांश लोकांना ओमायक्रॉनची (Omicron Variant) लागण झाली आहेत. ओमायक्रॉन जगभरात सध्या डेल्टाची जागा घेताना दिसत आहे. तसेच ज्यांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यांना ओमायक्रॉनमुळं पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत आहे. इतकेच नाही तर ज्यांनी कोरोनाच्या लसी घेतल्या आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉनमुळे कोरोनाची लागण होत आहे. 

ओमायक्रॉनला गांभीर्यानं घ्या : WHO 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस  यांनी काल याबाबत माहिती दिली. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

वेगानं फोफावतोय ओमायक्रॉन

हाती आलेल्या आकडेवारीनुसार,  जगभरात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. मागील डेल्टा प्रकारापेक्षा ओमायक्रॉन हा तीन पटीने पसरत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी 6 लाख 78 हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 1 जानेवारी 2022 रोजी 17 लाख 72 हजार दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, 12 जानेवारी 2022 रोजी हा आकडा वाढून जवळपास 28 लाख 46 पर्यंत पोहोचला. म्हणजेच, फक्त 12 दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येत 9 लाखांची वाढ झाली आहे. केवळ एवढंच नाही, गेल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या 22 एप्रिल 2021 रोजी सुमारे 9 लाख एवढी होती. तर 12 जानेवारी 2022 रोजी कोरोनाबाधितांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे.  

ओमायक्रॉन सर्दी नव्हे, निष्काळजीपणा नको, सतर्क राहा

ओमायक्रॉन साधे सर्दी-पडसे नसल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यामुळे निष्काळजीपणा दाखवू नये, सतर्क राहावे. ओमायक्रॉन ओळखण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली पाहिजे. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, नव्या गाइडलाइनअंतर्गत किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णंाना पॉझिटिव्ह आल्याच्या ७ दिवसांनी डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी