Omicron Virus Death : ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगातला पहिला बळी, ब्रिटनच्या पंतप्रधानांची माहिती

Omicron Virus Death : मागील दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. हा विळखा मागील काही महिन्यांत सैल होत आहे, असे वाटत असतानाच ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. 

Omicron Virus Death
ओमायक्रॉन व्हेरियंटने ब्रिटनमध्ये घेतला पहिला बळी   |  फोटो सौजन्य: BCCL

Omicron Virus Death : नवी दिल्ली :  मागील दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. हा विळखा मागील काही महिन्यांत सैल होत आहे, असे वाटत असतानाच ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. दरम्यान नुकतीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी युकेमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन किमान एका रुग्णाचा जीव गेल्याची माहिती दिली आहे. 

याविषयीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. दरम्यान या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटही जीवघेणा असल्याचे समोर आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. बोरिस वेस्ट लंडनमधील पॅडिंग्टन येथे एका लसीकरण क्लिनीकला भेट देण्यासाठी आले असताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,''दुर्देवाने ओमायक्रॉन चिंता वाढवत असून या व्हेरियंटची लागण झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच किमान एका व्यक्तीचातरी आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण होऊन मृत्यू झाला''

भारतातही ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा अनेक राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. रविवारपर्यंत (12 डिसेंबर) देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 37 वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय नागपूर, चंदीगढ आणि कर्नाटकमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी