Omircon Crisis : देशातील 15 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रवेश,पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

जगातील अनेक देशात कोरोना (Corona) चा नवा प्रकार ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढला आहे. भारतात पण ओमायक्रॉनचा धोका वाढू लागला आहे. देशातील पंधरा राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला असून आज कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

Omircon enters 15 states of the country, PM Modi convenes high level meeting
ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभुमीवर पीएम मोदींनी बोलवली बैठक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनबाबत काय निर्णय होणार?
  • 1 डिसेंबरपासून राज्यात एकूण 1,50,153 आंतरराष्ट्रीय प्रवासी आले
  • वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदीं बोलावली बैठक

Covid-19 New Variant: नवी दिल्ली : जगातील अनेक देशात कोरोना (Corona) चा नवा प्रकार ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढला आहे. भारतात पण ओमायक्रॉनचा धोका वाढू लागला आहे. देशातील पंधरा राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला असून आज कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे आतापर्यंत ओमिक्रॉनची 216 प्रकरणे आढळून आली आहेत. दिल्लीमध्ये 57 प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर महाराष्ट्रात 65, तेलंगणात 24, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18, केरळमध्ये 9 आणि गुजरातमध्ये 23, हरियाणामध्ये 1 ओमिक्रॉनची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशातील १५ राज्यांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

कोरोना तिप्पट वेगाने पसरतो आणि त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. मात्र या धोक्यानंतरही देशात सावधगिरी बाळगली जात नाही. यामुळेच केंद्राने राज्यांना पत्र लिहिले आहे. ज्या जिल्ह्यात 10 टक्क्यांपेक्षा संसर्गाचे प्रमाण असेल तर ही तिसरी लाट थांबवण्यासाठी तेथे कंटेनमेंट झोन तयार करावेत, रात्री कर्फ्यू लागू करावा, असे पत्रात म्हटले आहे.  लग्न आणि अंत्यसंस्कारातील लोकांची संख्या कमी करण्यासोबतच मोठ्या मेळाव्यात कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र पंतप्रधानांच्या बैठकीत अनेक प्रश्नांकडे लक्ष दिले जाणार आहे.  बुधवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉन या कोरोना विषाणूचा एकही नवीन प्रकार आढळून आलेला नाही. याच्या एक दिवस आधी राज्यात 11 नवीन रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, "आज राज्यात ओमायक्रॉन एकही नवीन प्रकरण नोंदवले गेले नाही. राज्यात आतापर्यंत अशा स्वरूपाचे एकूण 65 रुग्ण आढळून आले आहेत.

या सर्व रुग्णांपैकी 35 रूग्णांना RT-PCR चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 1 डिसेंबरपासून राज्यात एकूण 1,50,153 आंतरराष्ट्रीय प्रवासी आले आहेत. यापैकी 21,809 रुग्ण हे 'उच्च जोखीम' देशांतील आहेत आणि सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे. केंद्राने मंगळवारी सांगितले की देशातील ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता "सक्रिय" पावले उचलण्याची गरज आहे आणि रात्रीच्या कर्फ्यूचा विचार करण्याची गरज आहे.अशा स्थितीत नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनबाबत काय निर्णय होणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पुन्हा कठोर पावले उचलणार का? ओमिक्रॉनपासून संरक्षण करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार आहे? बूस्टर डोसबाबत काय निर्णय होणार? मुलांच्या लसीकरणाबाबत काही निर्णय होणार का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी