Karnataka: मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून कामगाराला बेदम मारहाण; चक्क नग्नावस्थेत चालण्यास पाडले भाग

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 13, 2022 | 17:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suspected Worker Beaten | मंगळवारी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील महाराजा पार्क येथे एका तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली आणि गर्दीच्या ठिकाणी नग्नावस्थेत चालण्यास भाग पाडले गेले.

On suspicion of molesting a young woman, the worker was beaten to death and stripped naked
मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून कामगाराला बेदम मारहाण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हसन शहर पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि चार अज्ञात लोकांविरुद्ध त्याच्यावर हल्ला करून त्याला नग्न केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला.
  • पोलिसांनी चार अज्ञात संशयितांवर कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
  • कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील महाराजा पार्क येथे एका तरुणीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली आणि गर्दीच्या ठिकाणी नग्नावस्थेत चालण्यास भाग पाडले.

Suspected Worker Beaten | बंगळुरू : मंगळवारी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील (Hassan District) महाराजा पार्क येथे एका तरुणीशी गैरवर्तन (Misbehaving With A Girl) केल्याच्या आरोपावरून एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली आणि गर्दीच्या ठिकाणी नग्नावस्थेत चालण्यास भाग पाडले गेले. दरम्यान मेघराज असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून तो विजयपुरा जिल्ह्यातील रहिवासी आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हसन शहरात तो एक बांधकाम कामगार म्हणून काम करतो. मेघराज गार्डनमधून फिरत असताना एका महिलेचा छळ करत असल्याचे स्थानिक रहिवाश्यांनी पाहिले. त्यानंतर पुरुषांच्या एका गटाने त्या मेघराजवर हल्ला चढवला अशी माहिती समोर आली आहे. (On suspicion of molesting a young woman, the worker was beaten to death and stripped naked). 

दरम्यान पुरूष गटावर या प्रकरणाची अधिकाऱ्यांना तक्रार करण्याऐवजी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर स्थानिकांनी संशयित आरोपीला गर्दीच्या ठिकाणी हेमावती पुतळ्याच्या सर्कलजवळ नग्न केले, तो एक प्रसिध्द ट्रॅफिक क्रॉसरोड आहे. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि मेघराजला तात्काळ घटनास्थळावरून पोलीस गाडीत नेण्यात आले. दरम्यान हसन शहर पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि चार अज्ञात लोकांविरुद्ध त्याच्यावर हल्ला करून त्याला नग्न केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला.

Read Also : देशात गोल्ड एक्सचेंज आल्याने असा होणार फायदा...

पोलिसांनी चार अज्ञात संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे हसन पोलिसांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले. दरम्यान दुसऱ्या एका घटनेत बंगळुरूमध्ये १२०० रुपयांच्या कर्जावरून ४ जानेवारीला एका १९ वर्षीय मजुराची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील ताज्या माहितीनुसार, त्याच्या हत्येच्या आरोपाखाली आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मेहबूब पाशा असे त्या मजूराचे नाव असून तो 'एके' कॉलनी येथील रहिवासी आहे. मित्राकडून घेतलेल्या १२०० रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याने मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या बचावासाठी मेहबूब धावून आल्याने त्याला त्याचा जीव गमवावा लागला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिकांत उर्फ ​​मणीने ऑगस्ट २०२० मध्ये मोबाइल-गेमिंग ॲपमध्ये खाते उघडण्यासाठी अल्पवयीन मुलाला १५०० रुपये दिले होते. त्यानंतर मणिकांतने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली तेव्हा मुलाने ३० रुपये परत केले. वारंवार विनंती केल्यानंतर देखील मुलाने परतफेड करण्यासाठी आणखी वेळ मागितला आणि त्याच रागातून मणिकांतने त्याला मारहाण केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी