Covid19 Active Cases in India : भारतात १ लाख ४ हजार ७८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

one lakh four thousand 781 covid19 active cases in India : भारतात १ लाख ४ हजार ७८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ५७९ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख ७५ हजार ३१२ जण बरे झाले.

one lakh four thousand 781 covid19 active cases in India
भारतात १ लाख ४ हजार ७८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • भारतात १ लाख ४ हजार ७८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • कोरोनामुळे देशात ४ लाख ८१ हजार ४८६ मृत्यू
  • ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ५७९ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख ७५ हजार ३१२ जण बरे झाले

Corona Cases in India : नवी दिल्ली : भारतात १ लाख ४ हजार ७८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ५७९ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख ७५ हजार ३१२ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ८१ हजार ४८६ मृत्यू झाले. ओमायक्रॉनचे भारतात १४३१ रुग्ण आढळले. यापैकी ४८८ जण बरे झाले आहेत. देशात ओमायक्रॉनचे ९४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात आतापर्यंत १ अब्ज ४५ कोटी २० लाख ३३ हजार ४५८ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ८४ कोटी ६४ लाख ६१ हजार ९६४ जणांना लसचा पहिला डोस तर ६० कोटी ५५ लाख ७१ हजार ४९४ जणांना दुसरा डोस टोचण्यात आला. 

देशात सध्या १८ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सोमवार ३ जानेवारी २०२२ पासून देशामध्ये १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल. आतापर्यंत देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि बिहार या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.

जगात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अमेरिकेत

आधुनिक आरोग्य सेवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अमेरिका या देशात १ कोटी ३३ लाख ४६ हजार ८५६ तर इंग्लंडमध्ये (युके) २४ लाख ७४ हजार ५३६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जगात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या आणि इंग्लंड (युके) दुसऱ्या स्थानी आहे. फ्रान्समध्ये १७ लाख ५७ हजार ९५६ तर स्पेनमध्ये ११ लाख ४८ हजार ३८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. इटलीत ९ लाख ९८४ तर रशियात ७ लाख २७ हजार २०३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जर्मनीत ६ लाख ८० हजार ७९२ तर नेदरलंडमध्ये ४ लाख ७१ हजार ५४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पोलंडमध्ये ३ लाख ८१ हजार ४२ तर मेक्सिकोत ३ लाख ७२ हजार ४७४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जगात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत ३०व्या स्थानी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी