one lakh nine thousand 568 covid19 active cases in India : नवी दिल्ली : भारतात १ लाख ९ हजार ५६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी ३४ लाख ८८ हजार ५१९ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ४ कोटी २८ लाख ५१ हजार ५९० जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ५ लाख २५ हजार १६८ मृत्यू झाले.
तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य
कोरोना संकटापासून रक्षण व्हावे यासाठी पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे, मास्क घालणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखणे, आरोग्याची काळजी घेणे, तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार करुन घेणे हे सोपे पण प्रभावी उपाय आहेत. नागरिकांनी या उपायांचा अवलंब करावा असे आवाहन सरकारी यंत्रणेने केले आहे.
भारतात आतापर्यंत १९७ कोटी ८४ लाख ८० हजार ०१५ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले आहेत. ज्यांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे आणि बूस्टर डोससठी पात्र आहेत अशांनी बूस्टर डोस घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत ७९ लाख ७९ हजार २६३ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ७८ लाख ०७ हजार ४३८ जण बरे झाले. राज्यात मागील २४ तासांत ३२४९ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४ मृत्यूची नोंद झाली तसेच ४१८९ जण बरे झाले. राज्यात २३ हजार ९९६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात केलेल्या ८ कोटी २० लाख ४४ हजार १२९ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ७९ हजार २६३ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९.७३ टक्के आणि रिकव्हरी रेट ९७.८५ टक्के आहे.