भारतात १ लाख ३६ हजार ७६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

one lakh thirty six thousand seventy six covid19 active cases in India : भारतात १ लाख ३६ हजार ७६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात मागील २४ तासांमध्ये २० हजार १३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तसेच १६ हजार ४८२ जण बरे झाले.

one lakh thirty six thousand seventy six covid19 active cases in India
भारतात १ लाख ३६ हजार ७६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात १ लाख ३६ हजार ७६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • देशात मागील २४ तासांमध्ये २० हजार १३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १६ हजार ४८२ जण बरे झाले
  • भारतात मागील २४ तासांत ३८ कोरोना मृत्यू

one lakh thirty six thousand seventy six covid19 active cases in India : भारतात १ लाख ३६ हजार ७६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात मागील २४ तासांमध्ये २० हजार १३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तसेच १६ हजार ४८२ जण बरे झाले. भारतात मागील २४ तासांत ३८ कोरोना मृत्यू झाले. देशात आतापर्यंत ५ लाख २५ हजार ५५७ कोरोना मृत्यू झाले. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतात १९९ कोटी २७ लाख २७ हजार ५५९ कोरोना प्रतिबंधक डोस टोचण्यात आले आहेत. मागील २४ तासांत देशात १३ लाख ४४ हजार ७१४ कोरोना प्रतिबंधक डोस टोचण्यात आले. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

देशात शुक्रवार १५ जुलै २०२२ पासून ७५ दिवस सरसकट सर्वांसाठी कोरोना लसीकरण विनामूल्य होणार आहेत. आपण पहिला, दुसरा अथवा तिसरा (प्रिकॉशन डोस किंवा बूस्टर डोस) यापैकी कोणताही डोस घेत असलात तरी सरकारी आरोग्य केंद्र आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर पैसे द्यावे लागणार नाही. आधी १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी पहिले दोन डोस विनामूल्य आणि तिसरा डोस सशुल्क स्वरुपात उपलब्ध होता. पण १५ जुलै २०२२ पासून ७५ दिवस सरसकट सर्वांसाठी लसचे तिन्ही डोस विनामूल्य उपलब्ध आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत देशात मोठ्या संख्येने लसीकरण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भारतात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावे लागतील अशा रुग्णांची संख्या नगण्य आहे. बहुसंख्य रुग्ण क्वारंटाइन होऊन आणि औषधे घेऊन दोन ते चार दिवसांत बरे होत आहेत. कोरोना मृत्यूच्या संख्येतही घट होत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावा तसेच स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घ्यावी, तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत; असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी