Indore Fire case : एकतर्फी प्रेम वेड्याने सात जणांना जाळलं, इंदौर येथील स्वर्णबाग कॉलनीतील 'अग्नी'कांडाचं सत्य आलं समोर

इंदौर (Indore) येथील विजय नगर (Vijay Nagar) भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीत (Swarnabagh Colony) एका इमारतीला (Building) आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. ही दुर्घटना विजय नगर पोलीस ठाण्याच्या (Police station) हद्दीत घडली होती, उन्हाळ्यात शॉर्टसर्किटमुळे (Short circuit) ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

One-sided love madness burnt seven people
'प्यार की आग', एकतर्फी प्रेम वेड्याने सात जणांना जाळलं  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • प्रकरणातील आरोपी सहा महिन्यांपूर्वी याच इमारतीत भाड्याने राहत होता
  • प्रियकर शुभम याने आधी एका तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला आणि मुलीने नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने ही भीषण आग लावली.

Indore Fire case:  भोपाळ : इंदौर (Indore) येथील विजय नगर (Vijay Nagar) भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीत (Swarnabagh Colony) एका इमारतीला (Building) आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. ही दुर्घटना विजय नगर पोलीस ठाण्याच्या (Police station) हद्दीत घडली होती, उन्हाळ्यात शॉर्टसर्किटमुळे (Short circuit) ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यात सात जणांचा मृत्यू झाला होता. परंतु या घटनेतील सत्य बाहेर आलं असून हे सत्य ऐकून अनेकांना धक्काा बसला आहे. 

विजयनगर भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीतील (Swarnbagh Colony) एका इमारतीला लागलेली आगी ही कोणताच शॉर्टसक्रिट नसून ही समजून उमजून केलेलं कांड आहे. काल संध्याकाळी पोलिसांनी या घटनेचा तपास करत वास्तव उघड केलं आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, या प्रकरणातील आरोपी सहा महिन्यांपूर्वी याच इमारतीत भाड्याने राहत होता. एकतर्फी प्रेम आणि पैशाच्या वादातून त्याने आग लावली. त्याच्या या कृत्यामुळे सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी हा मूळचा झाशीचा रहिवासी असून त्याचं नाव संजय तथा ​​शुभम दीक्षित आहे. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे तो झाशीतून इंदौर येथे राहण्यास आला. इंदूरचे पोलीस आयुक्त हरिनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पागल प्रियकर शुभम याने आधी एका तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला आणि मुलीने नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने ही भीषण आग लावली. नकार दिल्यानं आरोपीने तरुणीची गाडी पेटवली आणि इमारतीला मोठी आग लागली. या घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर जळालेल्या 8 जणांवर उपचार सुरू आहेत.

महिलेची प्रकृती स्थिर

या आगीत बळी पडलेल्या महिलेची प्रकृती सामान्य आहे. पोलीस तिच्याशी बोलले आहेत. या प्रकरणाचा थरार खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, घटनेदरम्यान स्कूटीला आग लागली होती. आता फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे. हा गुन्हा करण्यासाठी काही ज्वलनशील साहित्याचा वापर करण्यात आला होता. आता आरोपींवर खुनासह इतर अनेक कलमांखाली कडक कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

तपास कसा पुढे गेला?

पोलीस आयुक्त हरिनारायण मिश्रा म्हणाले की, या आगीत पोलिसांनी परिसरात लावलेले 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तरुण घटनेच्या वेळी स्कूटीला आग लावताना दिसत आहे. तरुणांने सोबत ज्वलनशील साहित्य आणले होते, त्यातूनच ही जाळपोळ करण्यात आली.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

शहरातील विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीला आग लागली. त्यामुळे उन्हाळ्यात शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आग इतकी भीषण होती की 7 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. या आगीत भाजलेल्या लोकांना माय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या आगीने काही मिनिटांतच भीषण रुप धारण केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी