PM Narendra Modi : मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तेलंगाणात वक्तव्य

Prime Minister Modi : मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो त्यामुळे मी आणखी सुदृढ होतो असे विधान पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी तेलंगणात केले आहे. आपल्या देवाने अशा प्रकारे बनवले आहे की शिव्या खाल्ल्यानंतर आपण आणखी ताकदवान बनतो असेही मोदी म्हणाले आहेत.

narendra modi
पंतप्रधान नंरेद्र मोदी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो त्यामुळे मी आणखी सुदृढ होतो
  • असे विधान पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी तेलंगणात केले आहे.
  • आपल्या देवाने अशा प्रकारे बनवले आहे की शिव्या खाल्ल्यानंतर आपण आणखी ताकदवान बनतो असेही मोदी म्हणाले आहेत.

Prime Minister Modi : हैदराबाद :मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो त्यामुळे मी आणखी सुदृढ होतो असे विधान पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी तेलंगणात केले आहे. आपल्या देवाने अशा प्रकारे बनवले आहे की शिव्या खाल्ल्यानंतर आपण आणखी ताकदवान बनतो असेही मोदी म्हणाले आहेत. (opposition abused me i get more stronger pm narendra modi in telangana criticized trs government)

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

तेलंगणात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो, या शिव्या माझ्या शरीरात गेल्यानंतर त्यांचे रुपांतर पोषणात होतं. देवाने माझ्या शरीराची रचनाच तशी केली आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काही लोक निराश होऊन मला सकाळ संध्याकाळ शिव्या देतात, मला शिव्या देण्यात त्यांचा शब्दकोशही संपला. परंतु तुम्ही चिंता करू नका, कारण त्यांच्याकडे शिव्या देण्यापलीकडे काहीच काम नाही असेही मोदी म्हणाले. गेल्या २०-२२ वर्षांत मी वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या खाल्ल्या. या शिव्यांवर तुम्ही मजा मस्करी करा कारण दुसर्‍या दिवशी कमळ फुलेल असेही मोदी म्हणाले. 

अधिक वाचा :  Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार; लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज


अंधश्रद्धा करा दूर - मोदी

हैदराबाद हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे माहेरघर आहे असे मोदी म्हणाले, परंतु अशा शहरात अंधश्रद्धा वाढते तेव्हा वाईट वाटतं. इथल्या राज्य सरकारने अंधश्रद्धेला राजाश्रय दिला असावा असे वाटते. तेलंगणात अंधश्रद्धेच्या नावाने काय काय सुरू आहे हे देशाच्या जनतेला कळाले पाहिजे. जर त्यांना तेलंगणाचा विकास करायचा असेल तर आधी या अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजे असेही मोदींनी नमूद केले.  

अधिक वाचा :  Crime : प्रेमात आला संशय...दिली 65 तोळे सोन्याची सुपारी... पत्नीनेच घडवून आणली हत्या, पाहा सिनेमास्टाइल गुन्हा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी