Parliament Winter Session : 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातून विरोधकांचा सभात्याग

Parliament Winter Session Updates: राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही विरोधकांनी सभात्याग केला असून दुपारी दोन वाजेपर्यंत अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. 

Parliament Winter Session
Winter Session : दोन्ही सभागृहातून विरोधकांचा सभात्याग  |  फोटो सौजन्य: Twitter

Parliament Winter Session Updates: नवी दिल्ली :  राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनानंतर आज संसदेच्या (Parliament ) दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही विरोधकांनी सभात्याग केला असून दुपारी दोन वाजेपर्यंत अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. 

 अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी खासदारांचे निलंबन मागे घेण्यास नकार देत सांगितलं की, ''12 खासदारांचं निलंबन नियमानुसार करण्यात आलं आहे.  विरोधकांनी आज चर्चा करावी किंवा सभात्याग करावा.'' खासदारांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रावर हल्लाबोल करताना म्हटलं की, ''सरकारचा धमकावण्याचा हा नवा प्रकार असल्याचे म्हटले आहे. सरकार बळजबरीनं माफी का मागायला लावतं आहे ? सरकारची अशी वृत्ती पहिल्यांदाच पाहिली.'' राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत म्हटले की, "आम्ही 12 खासदारांचं निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आलो होतो. घटना गेल्या पावसाळ्यातील आहे. मग आता हा निर्णय कसा घेण्यात येऊ शकतो?''

राज्यसभेच्या अध्यक्षांना कारवाई करण्याचा अधिकार - व्यंकय्या नायडू 

व्यंकय्या नायडू यांनी यावेळी म्हटलं की, ''गेल्या पावसाळी अधिवेशनातील वाईट अनुभव अजूनही आपल्यापैकी बहुतेकांना सतावतो. गेल्या अधिवेशनात जे काही घडले त्याबद्दल सभागृहातील प्रमुख नेते नाराजी व्यक्त करण्यासाठी पुढे येतील, अशी आशा आणि वाट पाहत होतो. राज्यसभेच्या अध्यक्षांना कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि सभागृही कारवाई करू शकते.''

चला जाणून घेऊ अधिवेशनाच्या 10 महत्त्वाच्या घडामोडी

  1. राज्यसभेतील खासदारांचे निलंबन मागे घेण्याची विरोधी पक्षांची मागणी व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, निलंबित खासदार बाहेर जाऊन आपले काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगत आहेत. 11 ऑगस्टला जे घडले ते देशाने पाहिले आहे.
  2. व्यंकय्या नायडू म्हणाले की, हे अधूनमधून व्हायला हवे, मात्र 17 दिवस सतत असे करणे योग्य नाही. ते म्हणाले की, सरकारवर हल्लाबोल करा आणि आंदोलन करा पण संसदेच्या प्रतिष्ठेचा आदर करा.
  3. राज्यसभेचे अध्यक्ष पुढे म्हणाले की, ९३ टक्के सदस्यांना सभागृह चालवायचे आहे. फक्त काही लोक गोंधळ घालत आहेत.
  4.  काँग्रेस, द्रमुक आणि नॅशनल कॉन्फरन्सने या संपूर्ण प्रकरणाचा लोकसभेच्या कामकाजातून वॉकआउट करताना तीव्र निषेध केला. खासदारांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
  5. दुसरीकडे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रावर हल्लाबोल करताना म्हणाले विरोधी पक्षांना धमकावण्याचा हा नवा प्रकार असल्याचे म्हटले आहे. . बळजबरीने माफी कशाला मागायची असे ते म्हणाले. सरकारची ही वृत्ती पहिल्यांदाच पाहिली.
  6. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, निलंबनाची कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे.
  7. विरोधी पक्षांचे नेते संसदेच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर राज्यसभा खासदारांच्या निलंबनाविरोधात निदर्शने करत आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
  8. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, राज्यसभेच्या १२ खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात आम्ही दिवसभर लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
  9. तत्पूर्वी, राज्यसभा खासदारांच्या निलंबनावरून काँग्रेससह 16 राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. मात्र, यात टीएमसीचा सहभाग नव्हता. निलंबन मागे न घेतल्यास राज्यसभेवर बहिष्कार टाकणार असल्याचे विरोधी पक्षांनी सांगितले.
  10. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सकाळीच सांगितले की, 11 ऑगस्ट रोजी खासदारांच्या गैरवर्तणुकीमुळे सरकारला हा जबरदस्तीचा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी माफी मागितल्यास निलंबन मागे घेण्याचा विचार करण्याची त्यांची तयारी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी