संसदेचे बजेट सेशन संपले, विरोधकांनी घेतली पीएम मोदींची भेट

Opposition leaders including Sonia Gandhi meet PM Modi at the end of the budget session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थात बजेट सेशन संपले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक भेट घेतली.

Opposition leaders including Sonia Gandhi meet PM Modi at the end of the budget session
संसदेचे बजेट सेशन संपले, विरोधकांनी घेतली पीएम मोदींची भेट 
थोडं पण कामाचं
  • संसदेचे बजेट सेशन संपले, विरोधकांनी घेतली पीएम मोदींची भेट
  • बजेट सेशनची सुरुवात ३१ जानेवारी २०२२ रोजी झाली
  • गुरुवारी दुपारी ७ एप्रिल २०२२ रोजी अधिवेशन संपले

Opposition leaders including Sonia Gandhi meet PM Modi at the end of the budget session : नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थात बजेट सेशन संपले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक भेट घेतली. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, टी आर बालू, फारुक अब्दुल्ला, अधीर रंजन चौधरी आदी नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. 

बजेट सेशन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अर्थात बजेट सेशनची सुरुवात ३१ जानेवारी २०२२ रोजी झाली. गुरुवारी दुपारी ७ एप्रिल २०२२ रोजी अधिवेशन संपले आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थात बजेट सेशनमध्ये १७७ तास ५० मिनिटे कामकाज झाले. यात १८२ तारांकीत प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. संसदेच्या परंपरेला अनुसरुन सेंट्रल हॉल येथे अभिभाषण झाले. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संयुक्त अधिवेशनात संबोधित केले. 

संसदेत पास झालेली महत्त्वाची विधेयके

अधिवेशनात महत्त्वाची विधेयके पारित अर्थात पास करून घेण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले. यंदाच्या अधिवेशनात आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचे बजेट अर्थात वित्त विधेयक २०२२, दिल्लीच्या तीन नगर निगम अर्थात पालिकांना एकमेकांत विलीन करून एक पालिका तयार करण्यासाठीचे दिल्ली नगर निगम संशोधन विधेयक २०२२, सामूहिक संहाराची आयुधे आणि त्यांच्या निर्मितीसाठी होणारा वित्तपुरवठा यासंदर्भातले विधेयक (Prohibit financing of weapons of mass destruction), गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे चेहऱ्याचा फोटो आणि डोळ्यांचे फोटो आदी महत्त्वाची माहिती संकलित करून सर्व तपास यंत्रणांना उपलब्ध करून देण्यासाठीचे ओळख पटविण्याकरिताचे दंड प्रक्रिया विधेयक २०२२ ही विधेयके पास झाली. अधिवेशन काळात दररोज सरासरी आठ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. 

अधिवेशनाच्या पहिला टप्प्याचे कामकाज ३१ जानेवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत झाले. दुसऱ्या टप्प्याचे कामकाज १४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी