लॉकडाऊनमध्ये दारूसाठी नका होऊ त्रस्त, लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा घरीच मागवा, तुमच्या मदतीला आहेत ही अॅप

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2021 | 18:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

घरबसल्या दारू मागवण्यासाठी किंवा ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या अॅप आणि वेबसाईट्सबद्दल जाणून घेऊया. लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे न राहता दारू मागवण्याचा भन्नाट पर्याय.

Order the liquor online in lockdown, use these Apps
लॉकडाऊनमध्ये दारू मागवा ऑनलाईन, ही आहेत अॅप 

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन मागवा दारू
  • दारूची ऑर्डर घरबसल्या
  • अॅप आणि वेबसाईटचा पर्याय

नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशात कोरोना संसर्गाने गंभीर रुप धारण केले आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग होऊन कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. आज दिल्लीतसुद्धा एक आठवड्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 

ऑनलाईन द्या दारूची ऑर्डर


दिल्ली कर्फ्यू लागू झाल्यामुळे दारूच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दारू विकत घेण्यासाठी लोकांची तारांबळ उडाली आहे. मात्र आता दारूच्या दुकानासमोरच्या लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्याच दारू मागवू शकता. आपल्या वेगवेगळ्या वस्तूंची ऑनलाईन शॉपिंग माहित असते. परंतु आता दारूसुद्धा ऑनलाईन मागवता येणार आहे. अनेक राज्यांमध्ये  ऑनलाईन दारू मागवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तुम्ही घरबसल्या ऑर्डर द्या आणि दारू तुमच्या दारापर्यत पोचवली जाईल. यासाठी अनेक अॅप आणि वेबसाईट उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही ऑनलाईन दारूची ऑर्डर देऊ शकता. या अॅप आणि वेबसाईटविषयी जाणून घेऊया.

Living Liquidz

या अॅपला तुम्ही गुगल प्लेस्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. या अॅपद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय आणि भारतीय अशा दोन्ही ब्रॅंडची दारू ऑर्डर करू शकता. या अॅपची सुविधा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि बंगळूरूसारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. या अॅपद्वारे दारूची ऑर्डर देण्यासाठी तुमचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक असले पाहिजे. याशिवाय या अॅपवर कॉल करून किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा त्यांच्या वेबसाईटद्वारे तुम्ही ऑर्डर देऊ शकता. शिवाय इथे तुम्ही पाच रुपयांत एका दिवसाचे लायसन्सदेखील विकत घेऊ शकता.

HipBar

ही सेवा २०१५मध्ये लॉंच करण्यात आली होती. इथे तुम्ही बिअर, व्हिस्की, टकीला, रम, ब्रांडी, जीन, वाईन आणि व्होडका सारख्या अनेक पर्यायांची ऑर्डर देऊ शकता. या अॅपला तुम्ही गुगल प्लेस्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. या अॅपद्वारे तुमच्या जवळच्या दारूच्या दुकानावरून ऑर्डर घेऊन तुम्हाला दारूची डिलिव्हरी करण्यात येते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. कोलकाता, हावडा, सिलीगुडी, कटक, भुवनेश्वर आणि रुरकेला येथे याची सेवा उपलब्ध आहे.

Zomato

या अॅपद्वारे तुम्ही भुवनेश्वर, कोलकाता, रांची, सिलीगुडी, झारखंड, ओडीशा, वेस्ट बंगाल या भागात दारू मागवू शकता. ऑर्डर केल्यानंतर ६० मिनिटांत तुमच्यापर्यत दारू पोचवण्यात येईल.

BeerBox

या अॅपसाठी तुम्ही Yellow.chat वर मेसेज, कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे ऑर्डर करू शकता. तुमचा ब्रांड निवडून तुम्ही तुमची माहिती द्यायची असते. दिवसभरात दारू तुमच्यापर्यत पोचवली जाते.

Swiggy

झोमॅटोप्रमाणेच स्विगीदेखील भुवनेश्वर, कोलकाता, रांची, सिलीगुडी, झारखंड, ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये सेवा पुरवते. 

liquorkart


ही वेबसाईट हैदराबाद आणि बंगळूरू येथे दारूची सेवा पुरवते. या वेबसाईटवर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटदेखील देण्यात येतात.

CSMCL app

हे अॅप छत्तीसगढमधील लोकांसाठी सेवा पुरवते. छत्तीसगढ स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लि.द्वारा हे अॅप बनवण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. दारूच्या डिलिव्हरीसाठी सरकारकडून १२० रुपये डिलिव्हरी शुल्क घेण्यात येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी