358 omicron affected in India : भारतातील ३५८ ओमायक्रॉनबाधितांपैकी ११४ झाले बरे

Out of 358 omicron affected in India 114 were cured : भारतात आढळलेल्या ३५८ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ११४ जण बरे झाले. इतर रुग्णांचे उपचार सुरू आहेत. भारतातील १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनबाधीत रुग्ण आढळले आहेत.

Out of 358 omicron affected in India 114 were cured
भारतातील ३५८ ओमायक्रॉनबाधितांपैकी ११४ झाले बरे 
थोडं पण कामाचं
  • भारतातील ३५८ ओमायक्रॉनबाधितांपैकी ११४ झाले बरे
  • भारतातील १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनबाधीत रुग्ण
  • सर्वाधिक ओमायक्रॉनबाधीत रुग्ण केरळ, महाराष्ट्र, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांमध्ये

Out of 358 omicron affected in India 114 were cured : नवी दिल्ली : भारतात आढळलेल्या ३५८ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ११४ जण बरे झाले. इतर रुग्णांचे उपचार सुरू आहेत. भारतातील १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनबाधीत रुग्ण आढळले आहेत. देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधीत रुग्ण केरळ, महाराष्ट्र, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांमध्ये आहेत. यातील अनेक जण एक-दोन आठवड्यांच्या आत बरे होत असल्याचे आढळले. ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली त्यांच्यातही सौम्य लक्षणे आढळली. काही जणांना तर चाचणीचा अहवाल आल्यानंतर ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे लक्षात आले, तोपर्यंत त्यांच्यात लक्षणे आढळली नव्हती. ज्यांना ओमायक्रॉनची बाधा होऊनही त्रास झाला नाही अथवा सौम्य स्वरुपाचा त्रास झाला अशा सर्व नागरिकांचे उपचार सुरू आहेत किंवा ते बरे झाले आहेत. 

देशात आढळलेल्या ३५८ ओमायक्रॉनबाधितांपैकी १८३ जणांच्या अहवालांचे विश्लेषण झाले आहे. यातील १२१ जण परदेशातून आले आहेत. ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे त्यापैकी ९१ टक्के जणांचे लसीकरण झाले आहे. तसेच  ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे त्यापैकी ७० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळले नव्हते. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने लसीकरणाची गती वाढवा आणि सर्वांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगा; अशा सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

omicron च्या संसर्गापासून वाचायचं ? तर अशा पध्दतीने face mask वापरा, जो विषाणूपासून तुमचे सरंक्षण करेल

Winter Diet: थंडीत खा या २ गोष्टी, इम्युनिटी सिस्टीम होईल मजबूत

Whatsapp आणि Facebook यूजर्स सावधान! या वेबसाइट्स बनवतायत कंगाल; वाचण्यासाठी हे करा

भारतात १४० कोटी ९७ लाखांपेक्षा जास्त लसीकरण

भारतात १४० कोटी ९७ लाखांपेक्षा जास्त लसीकरण झाले. देशात १ अब्ज ४० कोटी ९७ लाख १६ हजार ९०५ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ८३ कोटी ५८ लाख ९१ हजार ७४१ जणांना लसचा पहिला डोस तर ५७ कोटी ३८ लाख २५ हजार १६४ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. देशातील ८९ टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांना लसचा पहिला डोस तर ६१ टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला.

आरोग्य विभाग सज्ज

केंद्रीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात १८ लाख १० हजार ८३ आयसोलेशन बेड, ४ लाख ९४ हजार ३१४ ऑक्सीजन बेड, १ लाख ३९ हजार ३०० आयसीयू बेड, २४ हजार ५७ पीडियाट्रिक आयसीयू बेड, ६४ हजार ७९६ पीडियाट्रिक नॉन 
आयसीयू बेड आहेत. 

भारतात २४ हजार ८३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

भारतात २४ हजार ८३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४७ लाख ७२ हजार ६५७ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख १५ हजार ९७७ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ७९ हजार १३३ मृत्यू झाले.

कडक निर्बंध

  1. हरयाणात रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत 'नाइट कर्फ्यू'
  2. हरयाणात 'नाइट कर्फ्यू' नसताना सार्वजनिक ठिकाणी २०० पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई
  3. हरयाणात लसचा एकही डोस घेतला नसल्यास संबंधित व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी
  4. गुजरातमध्ये अहमदाबाद, वडोदरा (बडोदा), सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर, गांधीनगर, जुनागड येथे रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत 'नाइट कर्फ्यू'
  5. ओडिशात नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्षानिमित्त कोणताही सोहळा अथवा कार्यक्रम यांच्या आयोजनास बंदी तसेच सभा आणि मिरवणुकांवर बंदी
  6. ओडिशात ऑर्केस्‍ट्रा, हॉटेल, क्लब, रेस्टॉरंट, पार्क येथे गर्दी होईल अशा सोहळ्याचे, पार्टीचे अथवा सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी