Vaccination in India भारतात लसीकरणाने ओलांडला १११ कोटींचा टप्पा

Over 111 crore vaccine doses administered in India भारतात लसीकरणाने १११ कोटींचा टप्पा ओलांडला. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज ११ कोटी ४४ लाख ४१ हजार ३६५ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

Over 111 crore vaccine doses administered in India
भारतात लसीकरणाने ओलांडला १११ कोटींचा टप्पा 
थोडं पण कामाचं
  • भारतात लसीकरणाने ओलांडला १११ कोटींचा टप्पा
  • भारतात १ लाख ३७ हजार ६३६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • देशात आढळलेल्या ३ कोटी ४४ लाख १४ हजार ६०९ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३८ लाख १४ हजार ८० जण बरे झाले

Over 111 crore vaccine doses administered in India । नवी दिल्ली: भारतात लसीकरणाने १११ कोटींचा टप्पा ओलांडला. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज ११ कोटी ४४ लाख ४१ हजार ३६५ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ७५ कोटी १ लाख ८९ हजार ९०६ जणांना लसचा पहिला डोस तर ३६ कोटी ४२ लाख ५१ हजार ४५९ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये १३ कोटी ८६ लाख १० हजार ४४७ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. महाराष्ट्रात १० कोटी १८ लाख ६ हजार ८४० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. 

भारतात १ लाख ३७ हजार ६३६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

भारतात १ लाख ३७ हजार ६३६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४४ लाख १४ हजार ६०९ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३८ लाख १४ हजार ८० जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ६२ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला. 

भारताचे कोवॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी

India-made Covaxin is 77.8 percent effective । नवी दिल्ली: भारतीय कंपनीने विकसित केलेली कोवॅक्सिन ही लस कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या बाबतीत ७७.८ टक्के प्रभावी आहे. महत्त्वाचे म्हणजे कोवॅक्सिन ही लस कोरोना विषाणूच्या डेल्टा अवतारावरही प्रभावी आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. लॅन्सेट जर्नल हे एक साप्ताहिक आहे. या साप्ताहिकात वैद्यक शास्त्रातील नवनवे संशोधन तसेच उपचार पद्धती, औषधे, लस, शस्त्रक्रियांची आधुनिक तंत्र यांच्या संदर्भातील माहिती नियमित प्रसिद्ध होत असते. 

हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान झालेल्या चाचण्यांमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर / Indian Council of Medical Research / ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही / National Institute of Virology / NIV) या संस्था सहभागी झाल्या होत्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये कोवॅक्सिन लसचे दोन डोस घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. शिवाय लॅन्सेट जर्नलमध्ये कोवॅक्सिनच्या प्रभावाबाबतची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. देशात लसीकरण सुरू असताना लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीमुळे कोवॅक्सिनची विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी