मोदींच्या जन्मदिनी विश्वविक्रम, दिवसभरात अडीच कोटींपेक्षा जास्त लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारताने लसीकरणाचा नवा विश्वविक्रम केला. देशात दिवसभरात अडीच कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

Over 2.5 crore vaccine doses administered in a day, India sets record
मोदींच्या जन्मदिनी विश्वविक्रम, दिवसभरात अडीच कोटींपेक्षा जास्त लसीकरण 
थोडं पण कामाचं
  • मोदींच्या जन्मदिनी विश्वविक्रम, दिवसभरात अडीच कोटींपेक्षा जास्त लसीकरण
  • आतापर्यंत देशात ७९ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
  • लसचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५९ कोटींपेक्षा जास्त तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १९ कोटींपेक्षा जास्त

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारताने लसीकरणाचा नवा विश्वविक्रम केला. देशात दिवसभरात अडीच कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. भारताचे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी लसीकरण कार्यक्रम राबवणाऱ्या आरोग्य विभागाच्या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. Over 2.5 crore vaccine doses administered in a day, India sets record

देशात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रामुख्याने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लस सरकारी लसीकरण केंद्रांतून दिल्या जात आहेत. आतापर्यंत देशात ७९ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस देण्यात आला आहे. लसचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५९ कोटींपेक्षा जास्त तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १९ कोटींपेक्षा जास्त आहे. 

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्हीपैकी कोणतीही एक लस घेणाऱ्या व्यक्तीला ठराविक दिवसांच्या अंतराने संबंधित लसचे दोन डोस घ्यावे लागतात. भारताची लोकसंख्या १३९ कोटींपेक्षा जास्त आहे. देशातील ९० कोटींपेक्षा जास्त नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. यामुळे एवढ्या प्रचंड लोकसंख्येला लसचे दोन डोस देण्याची आव्हानात्मक मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून सुरू आहे. भारताच्या लस निर्मिती प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने वाढ करुन देशाची लसीकरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार लस निर्मात्यांशी समन्वय साधून देशातले लसीकरण शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला लसचे दोन डोस मिळावे यासाठी भारत सरकार नियोजन करत आहे. 

भारतात लस घेतलेल्यांना कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. ज्यांना लस घेऊनही कोरोना झाला अशांमध्ये मृत्यूचे प्रमाण तर आणखी नगण्य आहे. ज्यांचा लस घेऊनही कोरोनाने मृत्यू झाला त्यांच्यात जुनाट आजाराने ग्रस्त असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे भारतात सरकारी पातळीवरुन सातत्याने लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. कोरोना संकटापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आयसीएमआरच्या सूचनेनुसार लस घेणे हाच उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय आहे. 

लसीकरणाच्या ताज्या विश्वविक्रमामुळे ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही अशा नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. लवकरच मुलांसाठीच्या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस भारताता उपलब्ध होतील. यानंतर मुलांसाठीचे लसीकरण सुरू होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी