60 percent fully vaccinated in India : भारतातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

over 60 percent of the eligible population fully vaccinated in India : भारतातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज ४० कोटी ३ लाख ५७ हजार ६४१ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

over 60 percent of the eligible population fully vaccinated in India
भारतातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण 
थोडं पण कामाचं
  • भारतातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
  • भारतात १ अब्ज ४० कोटी ३ लाख ५७ हजार ६४१ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
  • ८३ कोटी ३७ लाख १३ हजार ११९ जणांना लसचा पहिला डोस तर ५६ कोटी ६६ लाख ४४ हजार ५२२ जणांना लसचा दुसरा डोस टोचला

over 60 percent of the eligible population fully vaccinated in India : नवी दिल्ली :  भारतातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले. को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज ४० कोटी ३ लाख ५७ हजार ६४१ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ८३ कोटी ३७ लाख १३ हजार ११९ जणांना लसचा पहिला डोस तर ५६ कोटी ६६ लाख ४४ हजार ५२२ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला.

भारतात सध्या १८ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले जात आहेत. देशाने १४० कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्याचा टप्पा पार पाडला आहे. भारताची लोकसंख्या १३९ कोटींपेक्षा जास्त आहे. यापैकी पात्र नागरिकांची लोकसंख्या ९० कोटींपेक्षा जास्त आहे.  सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. यामुळे भारतासाठी लसीकरण अतिशय आव्हानात्मक होते. पण हे आव्हान पेलून भारताने ६० टक्क्यांपेक्षा जास्त पात्र नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केले. भारतात सर्वाधिक लसचे डोस अनुक्रमे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि बिहार या पाच राज्यांमध्ये टोचण्यात आले.

कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील किमान ७० टक्के नागरिकांचे लसीकरण ३० जून २०२२ पर्यंत होणे आवश्यक आहे. हे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केले आहे. बूस्टर डोस पेक्षा आवश्यक असलेले लसीकरण पूर्ण करणे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक आहे. निवडक देशांमध्ये लसीकरण झाले आणि इतर देश लसच्या प्रतिक्षेत असतील तर कोरोना विषाणूला संसर्ग पसरविण्याची आणि स्वतःमध्ये बदल करण्याची संधी मिळत राहील. या वास्तवाचे भान राखून भारत सरकारने देशातील लसीकरणाला गती देतानाच अनेक गरीब देशांना कोवॅक्स या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत तसेच निवडक देशांना मित्रत्वाच्या नात्याने लसचे डोस पुरवले आहेत. भारताच्या या प्रयत्नांचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, भारतात ३ कोटी ४७ लाख ६५ हजार ९७६ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ३ कोटी ४२ लाख ८ हजार ९२६ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ७८ हजार ७५९ जणांचा मृत्यू झाला. भारतात ७८ हजार २९१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी