मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकांवर निर्बंध लावण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर भडकले ओवेसी, म्हणाले...

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 03, 2020 | 11:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेनेने सामना या आपल्या मुखपत्राच्या संपादकीयातून पर्यावरणरक्षण आणि ध्वनीप्रदूषणावर बोलताना केंद्र सरकारकडे मशिदींममध्ये ध्वनीक्षेपकांच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केली होती.

Asaduddin Owaisi
मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकांवर निर्बंध लावण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर भडकले ओवेसी, म्हणाले...  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकाच्या वापरावर बंदी आणण्याची शिवसेनेची मागणी
  • शिवसेनेचे म्हणणे आहे की यासाठी केंद्र सरकारने आध्यादेश आणावा
  • ओवेसींनी म्हटले की मुस्लिमविरोधी वक्तव्ये केल्यावर कोणीही तथ्यांचा विचार करत नाही

मुंबई: मशिदींमधून (Mosques) ध्वनीक्षेपक (loudspeaker) हटवण्याच्या शिवसेनेच्या (Shivsena) मागणीवर ऑल इंडिया मजालिस ए इत्तेहादुल मुस्लिमिनचे (एआयएमआयएम) (AIMIM) प्रमुख असदुद्दिन ओवेसी (Asadussin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसी यांनी म्हटले आहे की ध्वनीक्षेपकांच्या वापराबद्दल आधीपासूनच कायदे आहेत. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की जेव्हा आपण एखादे मुस्लिमविरोधी (anti-Muslim statement) वक्तव्य करता तेव्हा तथ्यांबद्दल कोणीही पर्वा करत नाही कारण काँग्रेस (Congress) आणि एनसीपीने (NCP) शिवसेनेला धर्मनिरपेक्ष (secular) असल्याचे प्रमाणपत्र (certificate) दिले आहे.

सामनाच्या संपादकीयातून शिवसेनेची मागणी

शिवसेनेने आपले मुखपत्र सामनाच्या संपादकीयातून पर्यावरणरक्षण आणि ध्वनीप्रदूषणावर बोलताना केंद्र सरकारकडे मशिदींममध्ये ध्वनीक्षेपकांच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केली होती. संपादकीयात लिहिले होते, ‘मशिंदींमध्ये ध्वनीक्षेपकांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवण्यासाठी केंद्र सरकारने एक अध्यादेश काढावा.’

ओवेसी यांनी दिली प्रतिक्रिया

शिवसेनेच्या या मागणीवर प्रतिक्रिया देत ओवेसी यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘ध्वनीक्षेपकांच्या वापरावर आधीपासूनच कायदे आहेत. पण जेव्हा आपण एखादे मुस्लिमविरोधी वक्तव्य करता तेव्हा तथ्यांबद्दल कोणीही पर्वा करत नाही कारण काँग्रेस आणि एनसीपीने शिवसेनेला धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे आणि याची आठवण करून देताना मला जराही आनंद होत नाही.’

शिवसेना नेत्याच्या वक्तव्यावरून गदारोळ

मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध लावण्याची मागणी शिवसेनेकडून अशावेळी करण्यात आली जेव्हा पक्षाचे मुंबई-दक्षिण विभागाचे प्रमुख पी. सकपाल यांनी मुस्लिम मुलांसाठी अजानची स्पर्धा आयोजित करण्याचे वक्तव्य केले होते. सकपाल यांच्या या वक्तव्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. याच वादादरम्यान संपादकीयातून ही मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेने केली होती भाजपावर टीका

संपादकीयात म्हटले होते की शिवसेनेच्या नेत्याने अजानची प्रशंसा केल्यावर भाजपाने केलेली टीका तशीच आहे जसे दिल्लीच्या सीमेवर कृषीकायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी आतंकवादी म्हणणे. लेखात असेही म्हटले आहे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये बहुतेक लोक असे आहेत जे माजी सैनिक होते किंवा ज्यांची मुले सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी