INX Media case: पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

P Chidambaram: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी चिदंबरम यांनी सीबीआय न्यायालयात हजर केलं, २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

P Chidambaram arrested by CBI on Wednesday
पी चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने अटक केली  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने पी चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक केली
  • पी चिदंबरम यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले
  • बुधवारी सायंकाळी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन चिदंबरम यांनी आरोप फेटाळले
  • काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन लक्ष वळवण्यासाठी केली अटक: कार्ति चिदंबरम

नवी दिल्ली: INX मीडिया प्रकरणात सीबीआयने बुधवारी रात्री माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. चिदंबरम यांना अटक केल्यानंतर गुरूवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सीबीआय न्यायालयाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयात युक्तीवाद करत असातना सीबीआयने चिदंबरम यांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती.

कडक सुरक्षा व्यवस्थेत पी चिदंबरम यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयातील कोर्ट नंबर ५०२ मध्ये त्यांना हजर करण्यात आलं. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हे पूर्वीपासूनच न्यायालयात उपस्थित होते.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने पी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आणि तेव्हापासून सीबीआय, ईडीचे अधिकारी चिदंबरम यांच्या मागावर होते. मात्र, चिदंबरम यांच्यासोबत संपर्क होत नव्हता. त्यानंतर तब्बल २७ तासांनी चिदंबरम हे दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बुधवारी रात्री अचानक दाखल झाले. यावेळी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरी सर्व आरोप फेटाळले. अवघ्या काही मिनिटांतच चिदंबरम यांनी पत्रकार परिषद संपवून दिल्लीतील घरी गेले. त्यानंतर सीबीआय, ईडीचे अधिकारी चिदंबरम यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांना अटक केली.

पी चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं की, भारतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून लोकशाही आणि कायद्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. सरकारतर्फे सीबीआय आणि ईडीचा वापर व्यक्तीगत बदला घेण्यासाठी करण्यात येत आहे. सुरजेवाला यांनी इंद्राणी मुखर्जी यांचा उल्लेख करत म्हटलं की, एका अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला अशा महिलेच्या जबाबावरुन अटक करण्यात आली आहे ज्या महिलेवर स्वत:च्या मुलीच्या हत्येचा आरोप आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
INX Media case: पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी Description: P Chidambaram: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी चिदंबरम यांनी सीबीआय न्यायालयात हजर केलं, २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी