Padma Awards List 2023 In Marathi: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मानाच्या अशा पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षी देशातील एकूण 106 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 19 महिला तर 2 हे परदेशी नागरिक आहेत. 7 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातून प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
नक्षल प्रभावग्रस्त भागातील युवकांचे पुनर्वसन यासह सामाजिक कारणांसाठी लोकनाट्य कलेचा वापर करण्याच्या योगदानाचा सन्मान म्हणून परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गडचिरोली येथील परशुराम खुणे यांना #PadmaShri — PIB in Maharashtra (@PIBMumbai) January 25, 2023
नक्षल प्रभावग्रस्त भागातील युवकांचे पुनर्वसन यासह सामाजिक कारणांसाठी लोकनाट्य कलेचा वापर करण्याच्या योगदानाचा सन्मान.#PadmaAwards pic.twitter.com/Vf7NphNJPc
समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इदाते व गजानन माने, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया, साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
डायरीयावरच्या ओआरएस या साध्या आणि प्रभावी भारतीय औषधाची देणगी जगाला देणारे डॉ दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पद्म पुरस्कार 2023 ची संपूर्ण यादी padmaawards.gov.in पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
Late SP patron Mulayam Singh Yadav, musician Zakir Hussain, late ORS pioneer Dilip Mahalanabis and S M Krishna to receive Padma Vibhushan. pic.twitter.com/EAXvFHw3Q9 — ANI (@ANI) January 25, 2023
तेलंगणातील 80 वर्षीय भाषाशास्त्राचे प्राध्यापक बी. रामकृष्ण रेड्डी यांना साहित्य आणि शिक्षण (भाषाशास्त्र) क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कांकेर येथील गोंड ट्रायबल वूड कार्वर अजय कुमार मंडावी यांना कला (लाकडावरील कोरीव काम) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.