Padma Shri to ex-Pak soldier पूर्वाश्रमीच्या पाकिस्तानी सैनिकाला भारताचा पद्मश्री पुरस्कार

Padma Shri to ex-Pak soldier who helped India liberate Bangladesh राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच नागरी सन्मान पुरस्कार दिले. याप्रसंगी पूर्वाश्रमीच्या पाकिस्तानी सैनिकाला भारताचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

Padma Shri to ex-Pak soldier who helped India liberate Bangladesh
पूर्वाश्रमीच्या पाकिस्तानी सैनिकाला भारताचा पद्मश्री पुरस्कार 
थोडं पण कामाचं
  • Padma Shri to ex-Pak soldier पूर्वाश्रमीच्या पाकिस्तानी सैनिकाला भारताचा पद्मश्री पुरस्कार
  • निवृत्त झालेल्या लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांना पद्मश्री
  • लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांच्या कारवायांमुळे १९७१ मध्ये भारताला वेगाने प्रभावी कामगिरी करण्यासाठी मोठी मदत मिळाली

Padma Shri to ex-Pak soldier who helped India liberate Bangladesh । नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच नागरी सन्मान पुरस्कार दिले. याप्रसंगी पूर्वाश्रमीच्या पाकिस्तानी सैनिकाला भारताचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. निवृत्त झालेल्या लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांचा पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला.

पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तानवर प्रचंड अन्याय करत होता. सैनिक असल्यामुळे उघडपणे या अन्यायावरोधात बोलणे कठीण होते. पण अप्रत्यक्षरित्या मदत करुन पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला हातभार लावणे शक्य होते. अर्थात या कृतीसाठी मोठा धोका पत्करावा लागणार होता. आपली कृती उघडकीस आली तर कोर्ट मार्शल होण्याचा धोका होता. कदाचित जीव पण गमवावा लागला असता. पण लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांनी धाडस दाखवले. त्यांनी पूर्व पाकिस्तानमध्ये प्रवेश केला. पुढे हुशारीने भारताच्या पश्चिम पाकिस्तान विरोधी कारवायांना बळ मिळेल, अशी व्यवस्था केली. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्यलढ्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी मोलाचे योगदान दिले. 

लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांच्या कारवायांमुळे १९७१ मध्ये भारताला वेगाने प्रभावी कामगिरी करण्यासाठी मोठी मदत मिळाली. पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगलादेश नावाच्या नव्या देशाची स्थापना झाली. 

बांगलादेशच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. या प्रसंगी काझी सज्जाद अली झहीर यांना पद्मश्री मिळणे ही विशेष बाब आहे. काझी सज्जाद अली झहीर आता ७१ वर्षांचे आहेत. पण मागील ५० वर्षांपासून पाकिस्तान त्यांना अटक करुन फाशी देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 'माझी पाकिस्तानमध्ये प्रलंबित असलेली शिक्षा हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे', असे ते कायम म्हणतात. काझी सज्जाद अली झहीर यांच्या कारवायांमुळे बांगलादेश निर्मितीला बळ मिळाले. यामुळेच भारत आणि बांगलादेशमध्ये आजही काझी सज्जाद अली झहीर यांच्या पराक्रमाचे कौतुक होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी