Accident : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पतीसोबत माहेरी जाणाऱ्या आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला डंपरने अशी धडक दिली की, तिच्या बाळाला बघण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. रस्त्यात एका महिलेला डंपरने चिरडले, त्यामुळे बाळाचा जन्म रस्त्याच्या मधोमध झाला. सध्या नवजात मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Painful: The dumper trampled the pregnant woman like this, the girl was born on the road itself)
अधिक वाचा : Sidhu Moose Wala: 'पुढचा नंबर तुमचा' सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरुन धमकीचा मेसेज
ही घटना आग्राच्या धनौली गावातील आहे, जिथे २४ वर्षीय महिला कामिनी (८ महिन्यांची गरोदर) फिरोजाबादच्या नारखी पोलीस स्टेशन हद्दीतील बरतारा गावात जात होती. पती रामकुमार उर्फ रामू याच्यासोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेला बायपास रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलने धडक दिली. असंतुलित झाल्याने दुचाकीवर मागे बसलेले रामकुमार आणि कामिनी रस्त्यावर पडले.
दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या डंपरने कामिनीच्या शरीराच्या वरच्या भागाला चिरडल्याने खालच्या भागावर दबाव आला आणि रस्त्यावरच बाळाचा जन्म झाला. यादरम्यान महिलेचाही मृत्यू झाला. डंपरने चिरडल्याने कामिनीचे हातपाय फ्रॅक्चर झाले होते, या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे कामिनीने एका मुलीला जन्म दिला, पण मुलीचा चेहरा न पाहता तिने जगाचा निरोप घेतला. जेव्हा लोकांनी हा अपघात रस्त्यात पाहिला तेव्हा ते हादरले, कारण आईचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी शेजारी नवजात मुलगी रडत होती. कामिनीचा नवराही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. लोकांनी तात्काळ कामिनीच्या नवजात मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले जेथे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कामिनीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.