पाकिस्तानने चीनकडे मागितली कोरोनाची लस, चीनने केला मोठा अपमान

जगाच्या राजकीय पटलावर कोणालाही सहकार्य करण्याच्या बाबतीत चीनची भूमिका नेहमीच संशयास्पद आणि अस्थिर असते. नेहमी भारताच्या विरोधात पाकिस्तानच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या चीनने लसीबाबत त्यांनाही धोका दिला आहे.

China and Pakistan
पाकिस्तानने चीनकडे मागितली कोरोनाची लस, पण चीनने फक्त 5 लाख डोस देऊन दाखवला हात 

थोडं पण कामाचं

  • भारताने केली शेजारी नेपाळला मदत, चीन मात्र कोरडाच
  • पाकिस्तानच्या गरजांबद्दल चीनशी झाली चर्चा
  • पाकिस्तानला यापेक्षा अधिक डोसची गरज

जगाच्या राजकीय (Global politics) पटलावर कोणालाही सहकार्य (cooperation) करण्याच्या बाबतीत चीनची (China) भूमिका नेहमीच संशयास्पद (suspicious) आणि अस्थिर (inconsistent) असते. नेहमी भारताच्या (India) विरोधात पाकिस्तानच्या (Pakistan) बाजूने उभ्या राहणाऱ्या चीनने लसीबाबत (vaccine) त्यांनाही धोका (betrayal) दिला आहे. 22 कोटीची लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानला चीनने फक्त 5 लाख लसींचे डोस देऊन वाटेला लावले आहे. यावेळी पाकिस्तानने मैत्रीच्या नात्याने चीनकडे मदत मागितली होती. एवढ्यावरच न थांबता चीनने असेही म्हटले आहे की आपले विमान घेऊन या आणि लस घेऊन जा.

भारताने केली शेजारी नेपाळला मदत, चीन मात्र कोरडाच

स्वतःला महासत्ता बनवणाऱ्या चीनची ही वर्तणूक फारच धक्कादायक म्हणावी लागेल. भारताने आपला शेजारी देश नेपाळला 10 लाख लसींचे डोस पाठवले आहेत. नेपाळची लोकसंख्या 3 कोटीपेक्षाही कमी आहे. तर 16 कोटींची लोकसंख्या असलेल्या बांगलादेशला भारताने 20 लाख डोसचा पुरवठा केला आहे. ही संख्या चीनकडून नेपाळला पुरवण्यात आलेल्या डोसच्या तुलनेत चौपट आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले आहे की चीन पाकिस्तानला 31 जानेवारीपर्यंत कोरोनाच्या लसीचे 5 लाख डोस देईल. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी पुढे असेही सांगितले की चीनने पाकिस्तानला आपले विमान पाठवून या लसीचे डोस घेऊन येण्यासही सांगितले आहे.

पाकिस्तानच्या गरजांबद्दल चीनशी झाली चर्चा

डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाशी विस्तृत चर्चा झाली आणि ही चर्चा पाकिस्तानच्या गरजा आणि आवश्यकतांवर होती. कुरेशी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या निर्देशांवरून चीनकडे  मदत मागितली होती. कुरेशी यांनी या घटनेला चांगली बातमी म्हणत म्हटले, ''मी देशाला चांगली बातमी देऊ इच्छितो. चीनने 31 जानेवारीपर्यंत 5 लाख डोस पाठवण्याचे वचन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की आपले विमान पाठवला आणि लस घेऊन जा.'' एका ट्वीटमध्ये कुरेशी यांनी असेही सांगितले की कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणारी ही लस सिनोफार्माची असेल ज्याला पाकिस्तानने मंजुरी दिली आहे.

पाकिस्तानला यापेक्षा अधिक डोसची गरज

कुरेशी यांनी यावेळी असेही सांगितले की त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना अशी कल्पना दिली आहे की पाकिस्तानला त्यांच्याकडून मिळणार असलेल्या संख्येपेक्षा जास्त लसींची गरज आहे आणि येत्या काळात त्यांना 11 लाख डोस हवे आहेत. कुरेशी यांनी सांगितले आहे की चीनने याबाबत विचार करण्याचे आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत 11 लाख डोस देण्याचे आश्वासन दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी