भारताला पाकिस्तानच्या हवाई मार्गाची गरज नाहीः परराष्ट्र मंत्रालय

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 18:27 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ बैठकीसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकला जाणार आहेत. या शिखर संमेलनासाठी मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाही आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं हे स्पष्ट केलं आहे.

PM Narendra Modi
भारताला पाकिस्तानच्या हवाई मार्गाची गरज नाहीः परराष्ट्र मंत्रालय  |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करणार नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान ओमानच्या मार्गावरून किर्गिस्तानची राजधानी बिश्केकला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. बिश्केकमध्ये एससीओची बैठक १३-१४ जूनला होणार आहे. या बैठकीत भारत सहभागी होणार आहे. पाकिस्तानचनं पंतप्रधान मोदींच्या विमानासाठी आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र उच्चस्तरीय झालेल्या बैठकीनंतर भारतानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतचा हा निर्णय पाकिस्तानसाठी आणखीन एक झटका आहे. भारतानं याआधीच दोन्ही देशातील चर्चेचा प्रस्ताव नाकारला आहे. भारताचं म्हणणं आहे की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणत्याच प्रकारची चर्चा होऊ शकत नाही. 

सरकारच्या उच्च पदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांचं विमान ओमान, इराण आणि मध्य आशिया देशाच्या हवाई क्षेत्रातून बिश्केकला पोहोचेल. पाकिस्ताननं पंतप्रधान मोदींच्या विमानासाठी आपला हवाई क्षेत्र खोलण्यासंबंधी बातचित केली आहे. मात्र पंतप्रधान मोदींचं विमान पाकिस्तानच्या हवाई मार्गानं बिश्केकला जाणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. आधीच पाकिस्तानकडून आलेला चर्चेचा प्रस्ताव भारतानं नाकारला. आता त्यातच हवाई मार्गाचा वापर न करण्याचा भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानला आणखीन एक झटका मिळाला आहे. 

भारत सरकारनं आपला निर्णय जाहीर केला आहे.  भारतानं स्पष्ट केलं की, आपले हवाई क्षेत्र उघडल्याबद्दल धन्यवाद! मात्र आम्ही आपले हवाई क्षेत्र वापरणार नाही आहोत. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की, एससीओ बैठकीत भारत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचं प्राधान्य देणार नाही आहे. या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं आधीच स्पष्ट केलं की, या संमेलनात दोन्ही देशांमध्ये कोणत्याच प्रकराची बैठक होणार नाही आहे. 

याआधी, भारताने पाकिस्तानला पीएम मोदींच्या विमानासाठी हवाई क्षेत्र उघडण्याची विनंती केली होती. भारताच्या या विनंतीनुसार पाकिस्ताननं आपलं हवाई क्षेत्र उडणार असल्याचं म्हटलं होतं. गेल्या २६ फेब्रुवारीला बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर भारतीय हवाई सेनेनं एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताननं आपलं हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या दक्षिणी क्षेत्रातील स्वतःचे दोन हवाई मार्ग सुरू केले होते. 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं की, भारताच्या विनंतीनुसार इमरान खान सरकार पंतप्रधान मोदींच्या विमानासाठी आपलं हवाई क्षेत्र उघडण्यासाठी तयार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, भारत सरकारला याबद्दल माहिती दिली जाईल. त्याचवेळी पाकिस्तानने आशा व्यक्त केली की भारत आपल्या चर्चेच्या प्रस्तावावरही प्रतिसाद देईल.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून काश्मिरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विनंती केली. मात्र भारतानं स्पष्ट केलं की, दहशतवाद जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भारताला पाकिस्तानच्या हवाई मार्गाची गरज नाहीः परराष्ट्र मंत्रालय Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ बैठकीसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकला जाणार आहेत. या शिखर संमेलनासाठी मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाही आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं हे स्पष्ट केलं आहे.
Loading...
Loading...
Loading...